Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपळे सौदागर आणि वाकड येथील स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केले दोन्ही स्पा सेंटर बंद...

      पिंपरी :- पिंपळे सौदागर आणि वाकड येथील स्पा सेंटर मध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू होता. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा यांनी या दोन्हीही स्पा सेंटरवर छापा टाकून चालकांविरोधात कारवाई केली आहे. तसेच हे दोन्हीही स्पा सेंटर बंद केले आहेत. 

      सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत NEW OM SPA शॉप नं ३०९, व्हिजन गॅलरी मॉल, कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर येथे अवैधरित्या स्पासेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवासाय चालु असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखा यांनी छापा टाकला. या कारवाईत आरोपी आकाश सुरेश साळवे, संदिप संतोष तिवारी यांच्या विरूध्द सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

      तसेच वाकड येथील RUPEN SPA ऑफिस नं ३९, चौथा मजला, सॉलिटेअर बिझनेस हब, ॲम्बियन्स हॉटेल जवळ, काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती, वाकड पुणे येथे अवैधरित्या स्पासेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी  छापा टाकला. या कारवाईत महिला आरोपी शैला कलप्पा कांबळे यांच्या विरुध्द वाकड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments