Hot Posts

6/recent/ticker-posts

नगर पंचायत-नगर पालिका निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा, कोणत्या शहरात कोण नगराध्यक्ष? - शशिकांत पाटोळे


         मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल रविवारी (21 डिसेंबर) समोर आले. राज्यातील एकूण 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी मतमोजणी रविवारी झाली. या निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीला पछाडल्याचं चित्र निकालावरून पाहायला मिळत आहे.

     देवेंद्र फडणवीस यांनी रात्री केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये महायुतीनं 215 नगर पालिकांमध्ये विजय मिळवला असल्याचा दावा केला आहे. त्यापैकी भाजपनं 129 जागा मिळवल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महायुतीनं एकूण जागांपैकी जवळपास 75 टक्के जागा जिंकल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

     राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगर पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबरला जाहीर केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले होते.

         20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान झाले. तसेच 143 सदस्य जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तर, आज मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होत आहे.

    या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात लढले. यावेळी बऱ्याच ठिकाणी वाद आणि तक्रारी पाहायला मिळाल्या.

      दरम्यान, उरण नगरपरिषदेच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाल्याची माहिती मिळाली. नाष्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक इसम स्ट्राँग रुममध्ये घुसल्याचा आरोप करण्यात आला असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अक्षेप घेतला. मतमोजणी सुरू होण्याआधी कुणालाच प्रवेश नसताना इसम स्ट्राँग रुममध्ये गेला कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.    

© जनतेने दाखवून दिले-धनंजय मुंडे.

     बीड जिल्ह्यात महायुतीचा वरचष्मा असल्याचं दिसून आलं. परळी नगर परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा जनतेने विश्वास दाखवल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. खासदार तळ ठोकून राहिले काय आणि कायमही राहिले काय पण जनतेने सर्वांना दाखवून दिलं, असं मुंडेंनी म्हटलं.

     तर बीड जिल्ह्यातील एकूण पाच नगर परिषदांमध्ये भाजपवर जनतेने विश्वास ठेवला असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या तर धारूर नगर परिषदेत काही फरकानं निसटता पराभव झाल्याचं त्यांनी सांगितलं.

      ईश्वरपूर पालिकेवर जयंत पाटील यांचा झेंडा फडकल्याचं पाहायला मिळाला. याठिकाणी नगराध्यक्ष पदासह त्यांचे 23 नगसेवक विजयी झाले.

© नागपूरमध्ये भाजपचा वरचष्मा...

    नागपूरमध्ये आतापर्यंत समोर आलेल्या निकालांमध्ये भाजपचा वरचष्मा असल्याचं पाहायला मिळालं. आतापर्यंत समोर आलेल्या नगराध्यक्ष पदांमध्ये भाजपचे 10 तर काँग्रेस, शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि गोंडवाना गणतंत्र या पक्षांचा प्रत्येकी एक नगराध्यक्ष निवडून आले आहेत.

© नागपूर नगरपंचायतचा निकाल खालीलप्रमाणे.

● मौदा - भाजप- प्रसन्न तिडके- विजयी

● कांन्द्री कन्हान - भाजप - सुजित पानतावणे

● निलडोह - भाजप - भूमिका मंडपे

● येरखेडा - भाजप- राजकिरण बर्वे

● गोधनी - भाजप - रोशना कोलते, महिला

● बेसा पिपळा - भाजपा - कीर्ती बडोले

● महादुला - भाजप हेमलता ठाकूर(सावजी)

© नागपूर नगर परिषदेचे निकाल खालीलप्रमाणे.

● कळमेश्वर नगर परिषद - अविनाश माकोडे - भाजप

● सावनेर नगर परिषद - संजना मंगळे - भाजप

● रामटेक नगर परिषद - बिकेंद्र महाजन- शिवसेना

● मोहपा - माधव चर्जन - काँग्रेस

● काटोल - अर्चना देशमुख, शेकाप, राष्ट्रवादी

● बुट्टीबोरी - सुमित मेंढे, गोंडवाना गणतंत्र, कॉंग्रेस समर्थित

● खापा - पीयूष बोरडे, भाजप


● सावनेर नगरपंचायत : भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना मंगळे विजयी.

© गडचिरोली जिल्हा..

● गडचिरोली नगर परिषद : नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रणोती निंबोरकर विजयी

● आरमोरी नगरपरिषद : नगराध्यक्षपदी भाजपचे रुपेश पुणेकर विजयी

● देसाईगंज नगरपालिका : नगराध्यक्षपदी भाजपच्या लता सुंदरकर मतांनी विजयी

© चंद्रपूर जिल्हा...

● वरोरा : नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अर्चना ठाकरे विजयी

● मूल : नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या एकता समर्थ विजयी

● राजुरा : नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अरुण धोटे विजयी

● गडचांदूर : नगराध्यक्षपदी अपक्ष नीलेश ताजने विजयी

● नागभीड : नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या स्मिता खापर्डे विजयी

● भद्रावती : नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या प्रफुल्ल चटकी विजयी

● घुघूस : नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या दीप्ती सोनटक्के विजयी

● चिमूर : भाजपच्या गीता लिंगायत विजयी

● ब्रह्मपुरी : नगराध्यक्षपदी काँग्रेसचे योगेश मीसार विजयी

● भिसी : नगरपंचायतीत भाजपचे अतुल पारवे विजयी

● बल्लारपूर : नगराध्यक्षपदी काँग्रेस उमेदवार अलका वाढई विजयी

© भंडारा जिल्हा..

● साकोली नगरपरिषद : नगराध्यक्षपदी भाजपच्या देवश्री कापगते विजयी

● पवनी नगरपरिषद : नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी (अजित पवार गट)उमेदवार डॉक्टर विजय नांदुरकर विजयी

● तुमसर नगरपरिषद : नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार सागर विजयी

● भंडारा नगरपरिषद : नगराध्यक्षपदी भाजपच्या मधुरा मदनकर विजयी

• अहिल्यानगर नगरपालिका निकाल...

● राहाता : नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर विजयी.

● संगमनेर : नगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीच्या डॉ. मैथिली तांबे विजयी

● देवळाली - प्रवरा (ता. राहुरी) : नगराध्यक्षपदी भाजपचे सत्यजित कदम विजयी

● पाथर्डी : नगराध्यक्षपदी भाजपचे अभय आव्हाड विजयी

● श्रीरामपूर : नगराध्यक्षपदी काँग्रेसचे करण ससाणे विजयी

● शिर्डी : नगरध्यक्षपदी भाजपच्या जयश्री थोरात विजयी

● श्रीगोंदा : नगराध्यक्षपदी भाजपच्या सुनिता खेतमाळीस विजयी

● जामखेड : नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार प्रांजल आमित चिंतामणी विजयी

● शेवगाव : नगराध्यक्षपदी शिंदेंसेनेच्या माया मुंडे विजयी

● राहुरी : नगराध्यक्षपदी विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे विजयी

● कोपरगाव : नगराध्यक्षपदी भाजपचे पराग संधान विजयी

● नेवासा : नागराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गट करणसिंह घुले विजयी

    अमरावती जिल्हा : नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार..

● धामणगाव रेल्वे - भाजपच्या अर्चना अडसड रोठे विजयी

● दर्यापूर - काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकडे विजयी

● अचलपूर - भाजप रूपाली माथने विजयी

● मोर्शी -शिवसेना शिंदे गट प्रतीक्षा गुल्हाने विजयी

● नांदगाव खंडेश्वर - शिवसेना ठाकरे गट प्राप्ती मारोडकर विजयी

● चिखलदरा - काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर विजयी

● धारणी नगरपंचायत - भाजपचे सुनील चौथमल विजयी

● चांदूर रेल्वे - बहुजन वंचित आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा विजयी

● वरूड - भाजपचे ईश्वर सलामे विजयी

● शेंदूरजना घाट -भाजपच्या सुवर्णा वरखेडे विजयी

● अंजनगाव सुर्जी - भाजपचे अविनाश गायगोले विजयी

● चांदूर बाजार - बच्चू कडू यांच्या प्रहारच्या मनीषा नांगलिया विजयी

© कोल्हापूर जिल्हा..

● पन्हाळा नगरपरिषद : नगराध्यक्षपदी जन सुराज्य शक्ती पक्षाच्या जयश्री प्रकाश पवार (तोरसे)

● जयसिंगपूर नगरपरिषद : नगराध्यक्षपदी राजर्षी शाहू विकास आघाडीचे संजय शामगोंडा पाटील-यड्रावकर

● कुरुंदवाड नगरपरिषद : नगराध्यक्षपदी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या मनीषा उदय डांगे

● हुपरी नगरपरिषद : नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे मंगलराव जिनाप्पा मालगे

● शिरोळ नगरपरिषद : नगराध्यक्षपदी शिव शाहू विकास आघाडीच्या योगिता सतिश कांबळे

© कुणाला किती जागा?

● मलकापूर नगर परिषद - मलकापूर नगरपरिषदेत जन सुराज्य शक्ती पक्षाचं वर्चस्व. जन सुराज्यच्या रश्मी शंतनु कोठावळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यांना 2265 मते पडली. या ठिकाणी जागांपैकी जन सुराज्य पक्षाला 11 जागा पडल्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 7 जागा, भाजपला 1 जागा तर 1 जागा अपक्षाला पडली.


● जेजुरी नगर परिषद - जेजुरी नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बारभाई जयदीप दिलीप विजयी झाले आहेत. त्यांना 7304 मतं मिळाली.

● चंदगड नगरपंचायत - चांदवड नगरपंचायतीत भाजपचे कानेकर सुनिल सुभाष विजयी ठरले आहेत. त्यांना 3967 मतं पडली. या नगरपंचायतीतील एकूण 17 जागांपैकी 8 जागा भाजप, 8 जागा राजर्षी शाहू आघाडी तर 1 जागा अपक्षाने जिंकली.

     सांगली जिल्ह्यात नगर परिषदेच्या 6 जागा आणि नगर पंचायतीच्या 2 अशा एकूण 8 जागांपैकी 2 जागा भाजप, 2 शिवसेना, शरद पवार गट - 2, 1 काँग्रेस आणि 1 स्थानिक विकास आघाडीने जिंकली. त्यानुसार -

● ईश्वरपूर नगरपरिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आनंदराव मलगुंडे विजय

● आष्टा नगरपरिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विशाल शिंदे विजयी

● तासगाव नगरपरिषद स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया सावंत विजयी

● पलूस नगरपरिषद काँग्रेसच्या संजीवनी पूदाले विजयी

● विटा नगरपरिषद शिवसेना शिंदे गटाचे काजल म्हेत्रे विजयी

● जत नगरपरिषद भाजपाचे रवींद्र आरळी विजयी.

● आटपाडी नगरपंचायत भाजपाचे उत्तम जाधव विजयी

● शिराळा नगरपंचायत शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीसिंग नाईक विजयी

● खेड नगरपरिषदेत महायुतीची एकहाती सत्ता..

खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने 21-0 असा ऐतिहासिक व एकतर्फी विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निकालात महायुतीने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीत शिवसेनेचे 17 उमेदवार विजयी, तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले.

● उरण नगरपरिषद - उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार भावना घाणेकर विजयी.

● ब्रह्मपुरी नगरपरिषद - काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीचा गड राखला. वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी नगरपरिषदेत काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश मिसार विजयी झाले. यावेळी गुलाल उधळून विजय जल्लोष करण्यात आला.

● चांदुर रेल्वे (अमरावती) - नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सौ.प्रियंकाताई निलेश विश्वकर्मा विजयी.

● संगमनेर नगरपरिषद - महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 16, 644 मतांच्या मताधिक्याने संगमनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. मैथिली तांबे यांचा विजय झालाय, तसेच 30 पैकी 27 नगरसेवकही निवडून आलेत.


आमदार सत्यजीत तांबे यांनी एक्सवर याबाबत पोस्ट शेअर करत संगमनेरकरांचे आभार मानले आहेत.

काटोलमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट व शेकापच्या उमेदवार अर्चना देशमुख 2050 मतांनी विजयी झाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार व शेकाप -12,भाजपा - 13

• घराणेशाहीचा जोर....

      या निवडणुकांमघध्येही घराणेशाहीचा जोर दिसून आला. घराणेशाही जोपासण्यात आणि आपल्या शहराची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आमदार, मंत्र्यांनी स्वत:च्याच नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचे समोर आले.

      यात पहिलं मोठं नाव म्हणजे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचं आहे. गिरीश महाजन यांनी त्यांची पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. विशेष म्हणजे त्या बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडून देखील आल्या.

    मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सून सेहरनिदा मुश्रीफ या कागल नगरपालिकेतून नगराध्यपदासाठी बिनविरोध निवडून आल्या.

    भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवर रावल या धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपलिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडून आल्या. इथे भाजपचे सगळे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत होते. त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या सगळ्या उमेदवारांनी माघार घेतली. त्यानंतर ते बिनविरोध निवडून आले.

     भुसावळचे भाजप आमदार आणि मंत्री संजय सावकारे यांनी सुद्धा पत्नी रजनी सावकारे यांना नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरवलं होतं.

      आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी त्यांच्या मुलीला यवतमाळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवलं. त्यांची मुलगी प्रियदर्शनी उईके नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली, त्यांच्याविरोधात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या.

    राष्ट्रवादीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक या सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उभ्या राहिल्या. याआधीही नाईक घराण्याकडे नगराध्यक्षपद होतं.

     भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना खामगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिकीट मिळालं. त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या.

• घराणेशाही नाही, असं म्हणणाऱ्या पक्षाची स्थिती...

     भाजपमध्ये घराणेशाही नाही असा दावा भाजप नेते नेहमीच करतात. पण, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र भाजपच्या मंत्र्यांच्या पत्नी, सुना आणि नातेवाईकांना तिकीट मिळालं. यामध्ये भाजपसह इतर पक्षांचे आमदारही मागे नसल्याचं चित्र दिसून आलं.

1. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषद निवडणुकीत भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पत्नी नलिनी भारसाकळे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आमदार भारसाकळे यांचे भाऊ सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी मंदाकिनी भारसाकळे यांना उमेदवारी दिली. म्हणजे एकाच घरात दोन उमेदवार असं चित्र होतं.

2. धामणगाव रेल्वे नगरपरिषदेसाठी भाजप आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे यांना नगराध्यक्षपदासाठी भाजपची उमेदवारी मिळाली.

3. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना भाजपनं चाळीसगाव नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचे तिकीट दिले होते.

4. धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगरपरिषदेसाठी भाजप आमदार अमरीश पटेल यांचे चिंरजीव चिंतन पटेल यांना भाजपनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती.

5. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे भाऊ मिलन कल्याणशेट्टी यांना तिकीट मिळाले.

6. भाजप आमदार हरीश पिंपळे यांचे मोठे बंधू भूपेंद्र पिंपळे यांना भाजपनं मूर्तिजापूर नगरपरिषदेतून नगरसेवक पदासाठी तिकीट दिले.

Post a Comment

0 Comments