Hot Posts

6/recent/ticker-posts

सतिश काळे यांचा क्रांतिरत्न पुरस्काराने गौरव.


   • देहुरोड बुद्धविहार कृती समिती व धम्मभूमी फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने.

        पिंपरी चिंचवड-: संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांना सामाजिक, वैचारिक व बहुजनहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘क्रांतिरत्न पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.    देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.

         बुद्धविहार कृती समिती व धम्मभूमी फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याचे संयोजक टेक्सास गायकवाड होते. अष्टप्रधान मंडळ, बुद्धविहार कृती समिती, धम्मभूमी सुरक्षा समिती, धम्मभूमी एज्युकेशन सोसायटी, धम्मभूमी महिला महासंघ व ज्येष्ठ उपासक संघ यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. 

            पुरस्कार प्रदान करताना आयोजकांनी नमूद केले की, “क्रांतिकारी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सतिश काळे यांनी निधड्या छातीने ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध लढा देत बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. मराठा व बहुजन बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी केलेली त्यांची कामगिरी अविस्मरणीय आहे.” ऐतिहासिक धम्मभूमीवर मिळालेल्या या सन्मानामुळे सामाजिक कार्यकर्ते, कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून सतिश काळे यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments