Hot Posts

6/recent/ticker-posts

ना पोलीस संरक्षण, ना ताफा, अजित पवार भल्या पहाटे गेले कुठे? अखेर लोकेशन आलं समोर, राज्यातील मोठी घडामोड - शशिकांत पाटोळे


             पुणे : पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे. वास्तविक, उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

       अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेल येथून कोणालाही काहीही न सांगता आणि आपला सरकारी पोलीस ताफा, पायलट कार व सुरक्षारक्षक तिथेच सोडून एकटेच अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे अजित पवार नेमकं कुठे गेले? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे.         

        पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील चर्चा फिसकटल्याचं बोललं जात असतानाच अजित पवार ‘कोणी मागे येऊ नका’ असं म्हणत निघून गेले. ते जिजाई निवासस्थानी पोहोचले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ते कौटुंबीक कारणासाठी तिथून बाहेर पडले की यामागे काही राजकीय कारण आहे? याबाबत आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.

       पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. दोन्ही राष्ट्रवादीत जागा वाटपाचं सूत्र देखील ठरलं होतं. मात्र ऐनवेळी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावरून ही चर्चा फिसकटल्याची माहिती समोर आली आहे. ही चर्चा फिसकटल्यानंतर अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडले आहेत.

Post a Comment

0 Comments