Hot Posts

6/recent/ticker-posts

शिरवळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई! – खंडणीसाठी अपहरण करून मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद

     सातारा जिल्हा प्रतिनिधी-:.‌ शिरवळ पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये खंडणीसाठी अपहरण करून मारहाण करणाऱ्या सराईत आरोपींना शिरवळ पोलिसांनी काही अल्पावधीतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.‌ मौजे भादे (ता. खंडाळा) येथील वीर धरणाच्या परिसरांत ही घटना घडली होती.

    इन्स्टाग्रामवरून चॅटींग करत महिलेसारखे बोलून तक्रारदारास भेटायला बोलावण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराला मारुती अल्टो कार (क्र. एमएच १२ एनई ३९७२) मध्ये जबरदस्ती बसवून अपहरण करण्यात आले. आरोपींनी त्याला फायबर काठी व हाताने मारहाण केली आणि "घडलेल्या घटनेबाबत कोणी काही सांगितले तर अॅट्रोसिटी व अत्याचाराचा गुन्हा दाखल करू" अशी धमकी दिली. एवढेच नव्हे, तर सदर कार खंडणीच्या स्वरूपात त्यांच्या नावावर करण्यास भाग पाडले.

     या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, व फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी तातडीने संबंधितांना अटक करण्याचे आदेश दिले.

    पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली. केवळ एका तासात शिरवळ पोलीसांनी आरोपींना गजाआड केले.

• अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे -

1. युट्युब पत्रकार किरण प्रकाश मोरे

2. मनसे खंडाळा तालुका अध्यक्ष इरफान दिलावर शेख

3. सातारा जिल्ह्यातून हद्दपार असलेला विशाल महादेव जाधव

   (सर्व रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा)

      सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार हे करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या आरोपींच्या विरोधात कोणालाही तक्रार असल्यास निर्भीडपणे पुढे येऊन शिरवळ पोलीस ठाण्यात माहिती द्यावी.

     ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के, उपनिरीक्षक सतिश आंदेलवार तसेच अंमलदार विलास यादव, सचिन चीर, सुरेश मोरे, गिरिश भोईटे, अजय जुडार, अरविंद बऱ्हाळे, सचिन चव्हाण, मंगेश मोझर, अक्षय बगाड, रामकिसन केकाण, अक्षय नेवसे, योगेश चिमटे, ज्ञानेश्वरी भोसले, निशा कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

      या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments