अहिल्यानगर-: अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकरीता विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वेय मिळालेल्या इंटरसेप्टर वाहनाव्दारे यापुढे शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अहिल्यानगर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक यांचे विरुध्द कारवाई करणार आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निदेशानुसार महामार्ग पोलीस विभाग व जिल्हा पोलीस घटकाकरीता वाटप करण्यात आलेल्या इंटरसेप्टर वाहना मध्ये ४ डी रडार स्पीडगन , बेथ अॅनालाझर, टिंट मीटर, पी.ओ. सिस्टम, प्रथमोचार किट, फायर एक्सेंजर अशी साधनसामुग्री असुन इंटरसेप्टर वाहनांव्दारे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्याकरीता प्रशिक्षित एक अधिकारी व ०२ पोलीस अंमलदारांची नेमणुक करुन नियमित पणे कारवाई करण्यात येणार आहे. मा. पोलीस अधीक्षक सो. अहिल्यानगर यांनी वाहन चालकांना वाहतुक नियमांचे पलन करण्याचे अवाहान केले आहे.
सदर इंटरसेप्टर वाहानाचे आज दिनांक ११/११/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे सो. अहिल्यानगर, यांचे हस्ते अनावरण करण्यात आले सदर कार्याक्रमावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री. वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक श्री. प्रेमदिप माने, मोटार परिवहन विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब बोरसे, शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अहिल्यानगर व वाहतुक शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार हजर होते.

0 Comments