
ढाका बांगलादेश-: ढाका हादरले! दोन हिंदूंच्या निर्घृण हत्येनंतर भारताने बांगलादेशला कडक इशारा दिला, अल्पसंख्याकांवरील अत्याचार थांबवण्याची मागणी.
• भारतविरोधी वक्तव्यं....
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमधील अनेक नेते भारताविरोधात आक्रमक वक्तव्यं करताना दिसत आहेत. बांगलादेशच्या नॅशनल सिटीझन पार्टीचे (एनसीपी) दक्षिण विभागाचे प्रमुख हसनत अब्दुल्ला यांनी भारताच्या उच्चायुक्तांना देशाबाहेर काढायला हवं होतं, असं म्हटलं होतं.
जर बांगलादेशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला तर भारतातील ईशान्येकडील 'सेव्हन सिस्टर्स' राज्यांना वेगळं केलं जाईल असा इशारा हसनत अब्दुल्ला यांनी दिला होता. यानंतर भारताने दिल्लीतील बांगलादेशचे उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला यांना बोलावून, ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.
बांग्लादेशमध्ये नुकत्याच घडलेल्या दोन हिंदू व्यक्तींच्या हत्येवर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अल्पसंख्याक समुदायातील लोकांना लक्ष्य करून घडत असलेल्या घटनांची मालिका अत्यंत चिंताजनक असल्याचे भारताने स्पष्ट केले असून, अशा प्रकारच्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा इशाराही दिला आहे. मोदी सरकारने या घटनांवर गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, सीमापार घडणाऱ्या या घटनांकडे भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. हिंदू समुदायावर होत असलेल्या हिंसेचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला असून, या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना ओळखून त्यांना शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
रणधीर जायसवाल म्हणाले की, बांग्लादेशमध्ये अल्पसंख्याकांविरोधात सातत्याने दिसून येणारी शत्रुत्वाची भावना अत्यंत चिंतेची बाब आहे. नुकत्याच दोन हिंदू युवकाची हत्या झाली असून, या अमानुष घटनेचा भारत निषेध करतो. या गुन्ह्यातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. बांग्लादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीच्या लिंचिंगनंतर अवघ्या एका दिवसात समोर आले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर होत असलेल्या हिंसक घटनांची संख्या वाढताना दिसत असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक पोलिस आणि माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ताजी घटना ढाक्यापासून सुमारे १४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या राजबाडी जिल्ह्यातील पांग्शा उपजिल्ह्यात घडली. दलित समाजातील अमृत मंडल व दिपू चंद्र दास असे मृत व्यक्तींचे नावे असून, उगाहीच्या आरोपांनंतर स्थानिक लोकांनी त्यांना मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे. भालुका पोलीस ठाण्यातील ड्युटी ऑफिसर रिपन मिया यांनी माहिती देताना सांगितलं, "या युवकाला मारहाण करुन गतप्राण केल्यावर त्याचं प्रेत एका झाडाला बांधण्यात आलं आणि आग लावली." या मृताचं नाव दीपचंद दास होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.
या युवक एका कपड्याच्या एका स्थानिक कारखान्यात काम करत होता आणि त्याच परिसरात भाड्याच्या खोलीत राहात होता असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भालुका पोलीस ठाण्याचे ड्युटी ऑफिसर रिपन मिया म्हणाले, "गुरुवारी रात्री सुमारे ९ वाजता काही लोकांनी त्याला पैगंबरांचा अपमान केल्याचा आरोप करत पकडलं आणि त्याला मारहाण केली. नंतर त्याच्या प्रेताला आग लावून दिली."
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थिती नियंत्रणात आणली, असं हे अधिकारी म्हणाले. या युवकाचं शव मयमनसिंह वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आल्याचं सांगितलं आहे. रिपन मिया यांनी सांगितलं, "आम्ही त्यांच्या नातलगांना शोधत आहोत, जर त्यांनी येऊन तक्रार दिली तर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल."
राजबाडीतील ही घटना काही दिवसांपूर्वी मैमनसिंह येथे झालेल्या आणखी एका हिंदू व्यक्तीच्या मारहाणीतून झालेल्या मृत्यूनंतर घडली आहे. या सतत घडणाऱ्या घटनांमुळे बांग्लादेशमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
0 Comments