Hot Posts

6/recent/ticker-posts

सातारा जिल्ह्यातील अवैध धंदे मोडीत काढणार:- जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आता अँक्शन मोडवर !

       सातारा-:  (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्हा व ग्रामीण भागातील  सर्वसामान्य जनतेतून जिल्ह्यात चालणाऱ्या अवैधरित्या धंद्याबाबत सातारा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे दिसून येत आहे. आणि जिल्ह्यातील मीडिया दैनिक वृत्तांतून या सर्वसामान्य जनतेची दखल घेवुन प्रसार माध्यमांतून सातारा पोलिसांच्या बातम्या प्रसिद्ध करत आहेत. 

      मात्र सातारा पोलीस प्रशासन हे नेहमीच प्रयत्नशील आहे असे म्हणण्यात काही वावगे ठरणार नाही, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात सातारा पोलिसांना पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे सातारा पोलीस प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे. चालणाऱ्या अवैधरित्या धंद्यावर नक्कीच कारवाईचा बडगा उभारणार आहोत.

       या करिता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अवैधरित्या धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील चालणाऱ्या अवैध धंदे मोडीत काढणार सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी...

Post a Comment

0 Comments