Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्याच्या दांडेकर पुलावर धक्कादायक घडलं.

         पुणे; दि.१३ (शशिकांत पाटोळे) : पुणे येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावल्याचे समोर आले आहे.

      या आगीत मुलाचे वडील ५० टक्के भाजले असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव रवींद्र उद्धव भालेराव (६१, रा. सर्व्हे क्र. १३० दांडेकर पूल) असे आहे. ही घटना दांडेकर पूल परिसरात घडली.

• काय घडलं नेमकं?

       मृतक रवींद्र भालेराव सुतारकाम करून उदरनिर्वाह करत असत. त्यांचा मुलगा सागर हा देखील छोटी मोठी कामे करतो. बाप-लेक दोघांनाही दारूचे व्यसन होते. शनिवारी (दि. ७) या दोघांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात सागरने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात वडील रवींद्र हे गंभीररीत्या भाजले गेले. आग भडकल्याने सागरने आग आटोक्यात आणली. त्यांनतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. ते पन्नास टक्के भाजले असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.

      त्यांच्यावर उपचार सुरु असतांना मंगळवारी मध्यरात्री भालेराव मरण पावले. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक सुभाष महाले पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments