Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची मशाल पेटली,


       पुणे; दि.०९ शशिकांत पाटोळे राज्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचा निकालही जाहीर झाला आहे.

       या पंचायत समितीत शिवसेनेनं एकहाती वर्चस्व स्थापन प्रस्थापित केलं आहे. एकूण १६ पैकी १२ जागांवर विजय मिळवून शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेना यूबीटीला ५ जागा जिंकण्यात यश मिळालं आहे.

        संपूर्ण जिल्ह्यातील निकाल पाहिला तर आमदार बाबाजी काळेंना संमिश्र यश मिळालं आहे. त्यामुळे खेडच्या निकालाची राज्यभर चर्चा रंगली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या बहिणीचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ अशीच परिस्थिती त्यांच्या मतदारसंघात निर्माण झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँगेस पक्ष, शिवसेना शिंदे गटाने सभांचा धडाका लावला होता. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने मोठी सभाही घेतली नव्हती. तसच दिग्गज नेते प्रचारासाठी फिरकलेही नव्हते. तरी देखील पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाने मोठा विजय मिळवला.

• पुणे जिल्हा परिषद ७३ पैकी ५५ जागांचे निकाल :

राष्ट्रवादी- ४०

भाजप- ७

शिवसेना- ४

शरद पवार गट – १

ठाकरे गट- ३

Post a Comment

0 Comments