
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी)-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आज शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १७ (वाल्हेकरवाडी-बिजलीनगर-प्रेमलोक पार्क-दळवी नगर) मध्ये पक्ष संघटना अधिक मजबूत झाली असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
यामध्ये बिजलीनगर येथील श्री. हनुमंत कृष्णा वाबळे यांची चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष पदी, प्राधिकरण (निगडी) येथील श्री. राजेंद्र शिवाजीराव कदम यांची पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष पदी, तर बिजलीनगर येथील श्री. दिलीप महादेव पानसरे यांची पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. शहराध्यक्ष योगेश बहल यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना नियुक्ती पत्रे प्रदान केली.
प्रभाग १७ सह निगडी भागात या अनुभवी कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षश्रेष्ठींकडून अभिनंदन करण्यात आले आहे. आगामी काळात जनसंपर्क वाढवणे आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

0 Comments