Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड येथे महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेस अठरा पगड बारा बलुतेदार फाउंडेशनचा जाहीर पाठिंबा.

      इंदापूर (प्रतिनिधी गणेश धनवडे )-: सासवड (पुरंदर) : महाराष्ट्र राज्य भारतीय शैली लालमाती कुस्ती संघ (सलग्न – भारतीय शैली कुस्ती महासंघ, भारत) यांच्या मान्यतेने 12 ते 15 मार्च 2026 या कालावधीत सासवड, पुरंदर येथे पारंपारिक व गौरवशाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.

         या स्पर्धेचे आयोजन पै. प्रकाशबाप्पू जगताप प्रतिष्ठान, सासवड यांच्या वतीने करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य सचिव पै. मोहन नाना खोपडे, पै. भरत नाना शिरसागर, पुरंदर केसरी पै. रघुनाथ जगताप, पै. आत्माराम कामथे, पै. राहुल यादव, पै. सिराज मुलाणी,पै.महेश गायकवाड ,आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे.

       या भव्य स्पर्धेस अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांचा जाहीर व संपूर्ण पाठिंबा असल्याचे प्रदेशाध्यक्ष राहुल भोंडे यांनी जाहीर केले. समाजहित आणि खेळाडूंच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयोजकांनी हाती घेतलेल्या या उपक्रमात फाउंडेशनचे सहकार्य कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

         यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, महाराष्ट्र राज्य खजिनदार इजाज पानसरे, राज्य मार्गदर्शक दिलीप गुरव, राज्य सदस्य बाळासाहेब जरांडे, राज्य सदस्य पै. मंगेश जाधव, राज्य सदस्य पै. निलेश पवार, राज्य युवक अध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शाम.जगताप, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीर मुलाणी, पुरंदर तालुका उपाध्यक्ष राहुल पवार, जेजुरी शहर अध्यक्ष सचिन कुंभार, जेजुरी शहर सदस्य गणेश चव्हाण, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. मानसी पवार, पुरंदर तालुका महिला अध्यक्षा सौ. मयूरी जराडे, पुरंदर तालुका उपाध्यक्षा सौ. सोनाली दोडके, तालुका सचिव सौ. योगिता मोरे, जेजुरी शहर सदस्य सौ. रोहिणी खुडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

        महाराष्ट्राची परंपरा जपणारी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वी होवो, अशी शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments