Hot Posts

6/recent/ticker-posts

मोठी बातमी! माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन - शशिकांत पाटोळे


          पुणे : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. सुरेश कलमाडी यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

       पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती. ते सक्रिय राजकारणातूनही दूर होते. सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. सुरेश कलमाडी यांनी मोठा काळ राजकारणात गाजवला. क्रीडा क्षेत्रातही मोठे काम सुरेश कलमाडी यांचे राहिले आहे. काही दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते.        

        सुरेश कलमाडी यांच्या जाण्याने मोठा धक्का लोकांना बसलाय. पुण्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. सुरेश कलमाडी पुण्यातील राजकारणात सक्रिय होते. आपले अर्धे आयुष्य कलमाडींनी राजकारणात घालवले. सुरेश कलमाडी यांच्या निधनाबद्दल कळताच नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. आज दुपारी २ वाजता सुरेश कलमाडी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल.

Post a Comment

0 Comments