या प्रभागातील निरीक्षणा दरम्यान उपमहापौर परशुराम वाडेकर मुंबई पुणे रोडवर असलेल्या आरोग्य कोठी, नाईक चाळ, भीम ज्योत नगर, सर्वे नंबर २६, पठाण चाळ, रेल्वे गेट, गांधीनगर, भोईटे चाळ आणि रेल्वे गेट नंबर २० या परिसरांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. प्रभागातील पाहणी दरम्यान औंध वार्ड ऑफिसचे अधिकारी, श्री. विजय नायकर (महापालिका सहायक आयुक्त), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विजय भोईर (डी. एस. आय.), स्थानिक मुकादम सोनम गायकवाड, सुपरवायझर पुरुषोत्तम कांबळे इत्यादी अधिकारी या दरम्यान उपस्थित होते.
या निरीक्षणा दरम्यान उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी स्थानिक पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, ड्रेनेज-सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते व स्ट्रीट लाईट संदर्भातील स्थानिक नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्या व लगेच संबंधित अधिकाऱ्यांना त्या-त्या कामासंदर्भात तत्काळ सूचना दिल्या व ते कामे मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी नागरिकांच्या समस्यांचे निवारण करणे हे आमचं पहिलं दायित्व असणार आहे व त्याला आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहोत. असे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून सांगण्यात आले.

0 Comments