Hot Posts

6/recent/ticker-posts

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल माजी विद्यार्थी – विद्यार्थीनी आंनद मेळावा संपन्न.

          पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २४ फेब्रुवारी २०२६ : शांताराम लांघे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदचे कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल लक्ष्मीनगर पर्वती पुणे येथे दि.२२/२/२०२६ रविवार रोजी शाहु कॉलेज जवळील कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल लक्ष्मीनगर पुणे येथे पार पडला. हरवलेली पाखरे येथील कां परत आपल्या घरट्यात एक दिवस भेटायला, हरवलेलं जीवन शोधण्यासाठी, जुन्या जीवलग मित्रांना भेटण्यासाठी, हितगुज करण्यासाठी, नव्या नात्याला उजाळा देण्यासाठी एकमेकांना भेटण्यासाठी या सर्वांचा आंनद लुटण्यासाठी, .या उद्देशाने आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.या आंनद मेळाव्यात १९८४ ते आतापर्यंत २०२६ पर्यंत सर्व दहावी वर्गातील (कक्षा) विद्यार्थी – विद्यार्थीनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाची सुरुवात शैक्षणिक दिंडी काढण्यात आली.

         त्या शैक्षणिक पालखी दिंडीमध्ये माजी विद्यार्थ्याने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, वह्या भेट देण्यात आल्या. पुढील मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक अशी. मानधन मदत माजी विद्यार्थ्यांनी यांनी केली. पुढे आम्ही अशीच आर्थिक, सहकार्य मदत करीत राहू असे आश्वासन माजी विद्यार्थांनी दिले. या आंनद मेळावा उत्साहात पार पाडण्यासाठी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदचे, कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलचे जनरल सेक्रेटरी मा. गायकवाड मॅडम मुख्याध्यापक ऐ.एस.माने सर, माजी विद्यार्थ्यांचे आदर्श मार्गदर्शक शिक्षक मा. मुख्याध्यापक भैलुमे सर सर्व शिक्षक, गुरुजन वर्ग माजी विद्यार्थी वर्ग यांनी आयोजन व नियोजन केले होते. या कार्यक्रमाला सर्व माजी विद्यार्थाचे त्या वेळेचे माजी गुरुजन, शिक्षण वर्ग, घोलप मॅडम, देशमुख मॅडम, काळे मॅडम, कांबळे मॅडम, पोखरकर सर नवीन शिक्षण इत्यादी उपस्थित होते. या कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलने असे अनेक हिरे घडवले वेगवेगळ्या क्षेत्रात, चांगल्या पद्धतीने माजी विद्यार्थी आता कार्यरत आहे. यांचा आम्हाला अभिमान आहे. पुढे असे असंख्य हिरे विद्यार्थी घडविण्याचे कार्य आम्ही हाती घेतले आहे. हा आमचा मानस आहे. असे मुख्याध्यापक ऐ.ऐस.माने सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

       माजी विद्यार्थ्यांनी आम्ही आपल्या मदतीला नेहमी तात्पर्य राहु, वेळेस प्रसंगी धावून येऊन आर्थिक मदत करु. असा शब्द दिला. हा आंनद मेळावा दरवर्षी मोठ्या उत्साहात असाच साजरा करावा. अशी ईच्छा व्यक्त केली. वीस ते पंचवीस कितेक वर्षानंतर आनंद मेळावा संपन्न झाला. यामुळे सर्व वातावरण आनंदमय झाले होते. शाळेतुन गेलेली पाखरे येतील का परत या “अपेक्षा” कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल वाट पाहत आहे. असे जणू जाणवतं होते. या कार्यक्रमाची सांगता माजी मुख्याध्यापक भैलुमे सर यांनी केली व माजी विद्यार्थी भरत पाटील, अशोक गोगावले, उदय जगताप, रुपेश कांबळे, महेंद्र कांबळे, ज्योती मोरे, मीनल निंवगुणे, युवराज मेमाणे या विद्यार्थीनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments