Hot Posts

6/recent/ticker-posts

द रायका स्कूल येथे शिवजयंतीनिमित्त रॅली..

 

      पिंपरी (शशिकांत पाटोळे) | दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर येथील द रायका स्कूल मध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शाळा परिसर भगव्या पताकांनी व प्रेरणादायी फलकांनी सजविण्यात आला होता.

       या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषण व पोवाडे सादर केले. यानंतर शाळेतून रॅलीला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी भगवे फेटे व पारंपरिक पोशाख परिधान करून शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदविला. ढोल-ताशांच्या गजरात रॅली उत्साहात पार पडली.

       रॅलीतील प्रमुख आकर्षण म्हणून लेझीम पथकाचे सादरीकरण तसेच लाठी-काठी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. रॅलीदरम्यान शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. विद्यालयाच्या प्राचार्या पूनम रायका यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

       यावेळी नगरसेविका अनिता काटे व कुंदा भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप शाळेच्या प्रांगणात झाला. शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने उत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

Post a Comment

0 Comments