Hot Posts

6/recent/ticker-posts

केरळ मध्ये कमळ फुलले, इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर - शशिकांत पाटोळे


        थिरूअनंतपुरम : केरळची राजधानी थिरूअनंतपुरम मनपावर भाजपने विजय मिळवला आहे. गेल्या ४५ वर्षांपासून ही मनपा सीपीआय (एम) यांच्या नेतृत्वाखालील एलडीएलच्या ताब्यात होती. या विजयामुळे पुढील वर्षी केरळातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला मोठे संकेत मिळत आहेत.

     थिरूअनंतपुरम मनपाच्या १०१ प्रभागापैकी ५० जागांवर भाजपने विजय मिळवला. तर एलडीएफला केवळ २९ जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला केवळ १९ जागी विजय मिळाला. दोन अपक्ष उमेदवारही विजय झाले आहेत. तसेच एका वार्डात गेल्या आठवड्यात निवडणुकीच्या वातावरणामध्ये एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे त्या वार्डामधील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली होती असे सांगण्यात येत आहे.

        

       पलक्कड नगरपालिकेत रालोआने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या नगर पालिकेत यूडीएफचा पराभव केला. त्रिशूरमध्ये भाजप कोडुंगल्लूर नगर पालिकेतील ४६ पैकी १८, त्रिशूर मनपात ८, गुरुवयूर आणि वडक्कनचेरी नगर पालिकेत दोन-दोन, कुन्नमकुलम नगर पालिकेत ७, इरिंजलाकुडा नगर पालिकेत ६ आणि चलाकुडी नगर मनपात एक जागा जिंकली आहे.

      निवडणुकीच्या या निकालानंतर शहराचा राजकीय वातावरण बदलल्याचे दिसून येत आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी एनडीए मजबूत स्थितीत दिसून येत आहे. तिरूअनंतपुरम जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांचे शहर असल्यामुळे हा निकाल राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. राज्याच्या राजधानीत भाजपचा विजय झाल्यामुळे ही बाब देखील अधोरेखित होत आहे.

      केरळच्या निकालानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार शशी थरूर यांनीदेखील भाजपचा हा विजय अनपेक्षित, आश्चर्यकारक मानलेला आहे आणि याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. तसेच काँग्रेस प्रणित आघाडी यु डी एफ ने केलेल्या एकूण कामगारी बद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन व्यक्त केलेले आहे. राज्यात विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी या निवडणुकी मधून महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. तसेच तिरूअनंतपुरम जिल्ह्यात भाजपने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची देखील कबुली दिली आहे.

      केरळ राज्य निवडणूक आयोगाच्या दुपारच्या माहितीनुसार, भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडीने केरळात १०८५ ग्रामपंचायत प्रभाग, ४४ पंचायत समिती प्रभाग जिंकले आहेत.

        थिरूअनंतपुरम मनपाच्या निवडणुकीत एलडीएफच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचार उघड करण्याचे काम भाजपने केले होते. त्यामुळे मतदारांनी भाजपला मते देऊन विजयी केले.

Post a Comment

0 Comments