Hot Posts

6/recent/ticker-posts

महिला पोलिसांने लाच मागितली विवाहितेच्या केसात हात फिरवत इशारा, अन् दोन मिनिटात एसीबीच्या जाळ्यात !

          छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)-:  छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील महिला पोलिस अंमलदार लता बाळासाहेब दराडे (वय 37) यांनी पतीने दिलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याच्या मोबदल्या महिला पोलीस अंमलदार लता दराडे यांनी पत्नी आणि तिच्या मित्राकडे 20 हजारांची लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी एसीबीने सापळा रचून ही कारवाई करीत महिला पोलीस अंमलदार लता बाळासाहेब दराडे यांना घरातच अटक केली आहे. 

       त्या दौलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. यामध्ये कारवाई न करण्यासाठी लता दराडे यांनी तरुणी आणि तिच्या मित्राकडे प्रत्येकी 10 हजार रुपयाची लाच मागितली होती. मात्र संतप्त झालेल्या या दोघांनी एसीबीचे अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्याकडे तक्रार केली होती. पत्नीवर संशय येत असल्याने या दोघांचे वाद सुरू होते.

        त्यामुळे पती-पत्नीने तिच्या मित्राविरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आणि या तक्रारीचा तपास लता दराडे यांच्याकडे होता. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे पोलीस उपाधीक्षक  बाळासाहेब पाटील संगीता पाटील सुरेश नाईकनवरे दीपक इंगळे सचिन बारसे रामेश्वर गोरे सी.एन बागूल आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments