पुणे. विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल ! शुभांगी सरोदे ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी. पुण्यातील बुधवार पेठेत गुरुवारी सायंकाळी एका 19 वर्षीय तरुणीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आपले आयुष्य संपविले आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून. या घटनेनंतर परिसरांत एकच खळबळ उडाली मात्र ही तरुणी नेमकी कोण? आणि या तरुणीने टोकाचं पाऊल का उचललं? व तरुणी सोबत नेमके घडले काय? असे अनेक प्रश्न कालच निर्माण झाले होते.
दरम्यान पोलीस तपासात काही प्रश्नांचे कोडं सुटले आहे. पोलिसांना या प्रकरणाचा तपास करताना सुसाईड नोट सापडली आहे. मृत तरुणीचे नुकतेच लग्न झाले होते, पण ती घरातल्यांना योग्यतेची नव्हती व ती या कामाला कंटाळली होती. असे या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं होतं. मानसी भगवान गोपाळघरे असे या मृत तरुणीचे नाव आहे. मूळची ती नगर जिल्ह्यातील आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला मृत तरुणी मागील काही दिवसांपासून याच इमारतीमध्ये वास्तव्यास होती. या घटनेनंतर परिसरांत बघ्याची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या विश्रामबाग पोलीस तपास करीत आहेत.

0 Comments