
• अध्यक्षा स्नेहल देव यांचा स्तुत्य उपक्रम.
नाशिक (प्रतिनिधी) ग्रामीण व आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या "नमस्ते नाशिक फाऊंडेशन नाशिक" संस्थेच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून ब्लॅंकेट व ग्रामीण भागातील मुलींसाठी ड्रेस वाटपचा कार्यक्रम अंधारेवाडी बेजे ,तालुका त्रिंबक जल्ह नाशिक येथे उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत पार पडला. 
असं म्हणतात की जर माणसाकडे देण्याची दानत असेल तर त्याला आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही याच अनुषंगाने नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून आज महाराष्ट्रातील त्र्यंबक तालुक्यातील छोट्याशा वाडीवर जाऊन त्यांनी शंभर वर अधिक ब्लॅंकेट चे वाटप केले.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित लाभार्थ्यांनी संस्थेचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे गावात सामाजिक एकतेची भावना अधिक मजबूत होते, अशी भावना व्यक्त केली. ब्लॅंकेट मिळाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. एका वृद्ध लाभार्थ्याने सांगितले,आम्ही दरवर्षी थंडीचा त्रास सहन करतो. 
आज नमस्ते नाशिक फाऊंडेशन नाशिक यांनी हा उपक्रम राबविलामुळे उबदार ब्लॅंकेट व मुलींसाठी ड्रेस मिळाले ही आमच्या दृष्टीने फार मोठी उपलब्धी आहे.कार्यक्रमात भंडारी, प्रकाश पोटिंदे,संतोष चव्हाण, सागर चव्हाण, संतोष पोटिंदे,शाम पोटिंदे,स्थानीक ग्रामस्थ,कार्यकर्ते, गावातील मान्यवर,महिला, बचतगटाचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडला. कार्यक्रमास महावीर इंटरनॅशनल चे अनिल नहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


0 Comments