
वाल्हेकरवाडी पिंपरी चिंचवड -: सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी वाल्हेकरवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या वाल्हेकरवाडी ग्रामस्थांच्या मिटींग मध्ये शिवस्मारक , स्मशानभूमी, दवाखाना , नदीसुधार या चार मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांपैकी श्री. भरत शंकर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रम चालू केला. वरील चार मुद्द्यांसंदर्भात आत्तापर्यंत केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे त्यांनी ग्रामस्थांसमोर सादर केली. त्यावर ग्रामस्थांनी सदर चार मुद्द्यांवर सकारात्मक भूमिकेतून चर्चा करून आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा करत असता प्रगतशील शेतकरी विठ्ठल तरूण मंडळाचे अध्यक्ष नथुशेठ मारूती वाल्हेकर यांनी साधारण तीस हजार मतदार ( प्रभागाच्या एकूण 50 टक्के ) असलेल्या वाल्हेकरवाडी परिसरातून सुप्रिया भरत वाल्हेकर यांना निवडून आणण्याची सूचना मांडली. त्यावर सर्व ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून संमती दिली. चर्चेनंतर सर्व ग्रामस्थांनी सुप्रिया वाल्हेकर यांना सर्वसाधारण महिला गटातून आपला उमेदवार म्हणून जाहीर केले .

या गोष्टींचा विचार करून वाल्हेकर वाडी ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या भविष्यासाठी सुप्रिया भरत वाल्हेकर यांची आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 17 सर्वसाधारण महिला गटातून उमेदवार म्हणून एकमताने निवड केली त्याचप्रमाणे सर्वसाधारण गटातून शुभम वाल्हेकर व अनुसूचित जाती महिला गटातून सौ.भाग्यश्री अक्षय चव्हाण व सौ. पुष्पाताई शंकर झोंबाडे यांच्या नावाची चर्चा होती. सदर मिटींग साठी संपुर्ण वाल्हेकर वाडी परिसरातून शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ जमले होते तसेच मोठ्या प्रमाणात महिलाही उपस्थित होत्या.
सदर मिटींगचे आयोजन वाल्हेकरवाडी ग्रामस्थांकडून यशस्वीरीत्या पार पडले.

0 Comments