Hot Posts

6/recent/ticker-posts

बच्चू कडूंच्या बेताल वक्तव्याचा शिव-शंभुभक्तांच्या मना-मनात असंतोष ;

• राजेशिर्केे वंशजांसह ऐतिहासिक सरदार घराण्यांकडून जाहीर निषेध ;

       पुणे (प्रतिनिधि):  माजी आमदार व शेतकरी नेते बच्चू कडू यांनी नुकतेच पातुर्डा, बुलढाणा येथील शेतकरी हक्क परिषदेच्या सभेत बोलताना छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्युस राजेंचे सासरेच ( स्वराज्यनिष्ठावंत श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के ) जबाबदार असून औरंगजेब नाहक बदनाम झाला असे बेताल वक्तव्य केल्याने राज्यभरातील इतिहासप्रेमी व शिव-शंभुभक्तांच्या मना-मनात असंतोष निर्माण झाला असून मराठा - कुणबी शेतकरी वर्गा बरोबरच राजेशिर्केे वंशज घराण्यांसह ऐतिहासिक सरदार वंशज घराण्यांकडून जाहीर निषेध व्यक्त होताना दिसत आहे. 

         माजी आमदार बच्चू कडू हे मोठे शेतकरी नेते असून, बच्चूभाऊंचे शेतकऱ्यांसाठी खुप मोठे योगदान आहे तसेच दिव्यांग व कष्टकरी वर्गासाठीही चांगले उल्लेखनीय कार्य आहे यात दुमत नाही परंतु त्यांनी छत्रपती शिव-शंभुकालीन वास्तव खरा इतिहास माहित नसताना अनऐतिहासिक चुकीचे बेताल वक्तव्य करणे सामाजिक दृष्ट्या योग्य नाही, त्यांनी सध्याच्या राजकारणात राजकीय लोकांवर वाट्टेल ती विधाने करावीत आमचा त्याला विरोध नाही. पण राजकारण आणि इतिहास हे दोन्ही विषय खुप वेगवेगळे आहेत. त्यामुळे बच्चू कडू व अन्य राजकीय लोकांनी इतिहास संसोधक होऊ नये अशी विनंती छत्रपती संभाजीराजेंचे सासऱ्यांकडील म्हणजेच महाराणी येसुबाईंच्या माहेरकडील राजेशिर्के घराण्याचे वंशज, माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष, शंभुसेना प्रमुख मा. दिपकराजे शिर्के यांनी केली आहे. 

       पुढे बोलताना दिपकराजे शिर्के म्हणाले की, छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्युस क्रूर मोघल औरंगजेबासह स्वराज्यभेदी कारभारी मंडळी व कारकुन जबाबदार आहेत हे अवघ्या जगाला सर्वश्रुत असताना देखील जबाबदार माजी आमदार शेतकरी नेते म्हणून काम करत असताना बच्चूभाऊंनी असे छत्रपती संभाजी महाराजांच्या सासऱ्यांवर स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराजे शिर्के व मेहुणे स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणे हे सामाजिक तेढ निर्माण करण्याचे लक्षण आहे. तर छत्रपती संभाजीराजांच्या मृत्युस औरंगजेब दोषी असताना दोषी नाही असे बेताल वक्तव्य करून चुकीचे मत मांडणे समाजात असंतोष निर्माण करणारे असल्याचे राजेशिर्के म्हणाले. 

       तरी तात्काळ  बच्चू कडू यांनी नागपुर येथील २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शेतकरी आंदोलना पूर्वी स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजेशिर्के घराण्याची, समस्त मराठा समाजासह मराठा- कुणबी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी श्रीमंत पिलाजीराजे शिर्के प्रतिष्ठाणचे पदाधिकारी व वंशज दिपकराजे शिर्के, आं.स्वा.मराठा महासंघाचे प्रदेश संपर्क प्रमुख लक्ष्मीकांत राजे शिर्के, भुषणराजे शिर्केे, सचिनराजे शिर्के, चेतनराजे शिर्के, कुणाल मालुसरे , राजेंद्र मोहिते, सचिन भोसले, अमित गाडे , आदींनी केली आहे अन्यथा भाऊबीजे नंतर वंशज घराणे व राज्यस्तरीय शिर्के घराणे कोअर कमिटी पत्रकार परिषद घेऊन नागपुर येथे निषेध आंदोलन करण्याबाबत दिशा ठरवेल असा इशारा समस्त राजे शिर्के व ऐतिहासिक सरदार घराण्यांनी कडू यांना दिला आहे.

Post a Comment

0 Comments