
पुणे : बाणेर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रायकर फॉर्म येथे दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्री नामदार अमितजी शहा यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त
विश्वविक्रमी ६१० किलोचा मोतीचूर लाडू बनविण्यात आला. त्यामध्ये १५० किलो बेसन, ३०० किलो साखर व १५० किलो तूप वापरून ६१० किलोचा सर्वात मोठा मोतीचूर लाडू बनविण्यात आला.
या लाडू चे वैशिष्ट्य असे की प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या साधकांनी लाडू बनवताना तो ईश्वराच्या आठवणीत ध्यानधारणा करून बनवला व बनल्यानंतर ही या लाडू समोर ध्यानधारणेचा अभ्यास केला. ईश्वरीय आठवणीने बनविलेला हा लाडू प्रसाद रूपाने पुण्यातील अनेक अनाथाश्रमामध्ये वाटला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.सर्वात मोठ्या विश्वविक्रमी वाढदिवसाच्या लाडूचे उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री, मा. नामदार. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ६१० किलो मोतीचूर लाडूचे विशेष म्हणजे Winners Book of World Records मध्ये याची नोंद करण्यात आली आहे. Winners Book of World Records च्या चेअरमन अभिनेत्री मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल यांनी हा विश्वविक्रम झाल्याची घोषणा केली. यावेळी मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र १८४ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय बी के डॉ. दीपक हरके, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, बाणेर सेवाकेंद्राच्या संचालिका बी के डॉ. त्रिवेणी व समृद्धी केटरर्स चे संचालक जालिंदर वाळके पाटील यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माझ्यावर जबाबदाऱ्या असल्यामुळे घरच्यांना चार-चार महिने वेळ देता येत नाही, त्यामुळे दिवाळीत आवर्जून घरच्यांना वेळ देत असतो परंतु आपणाकडून निरोप मिळाला आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम घेत आहोत आणि मला आपणास नाही म्हणता आले नाही कारण आपल्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री नामदार अमितभाई शहा यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ६१० किलो वजनाचा मोतीचूर लाडू प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या साधकांकडून तयार करण्यात येणार आहे व ते प्रसादरुपी पुण्यातील आश्रमांत वाटण्यात येणार आहे हे कळल्यानंतर मी स्वतःला या कार्यक्रमाला हजर राहण्यापासून रोखू शकलो नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर १९८२ ते ९७ या काळात घरापासून दूर राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ गुजरात सह चार राज्यांमध्ये प्रचारक म्हणून काम करत असताना अमित भाईंचा त्यांचा कसा संबंध आला हे देखील त्यांनी सांगितले आणि शेवटी या उपक्रमाचे आयोजक यांचे देखील त्यांनी तोंड भरून कौतुक केले.
तदनंतर आयोजकांच्या वतीने सन्माननीय मान्यवरांचे व कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानण्यात आले.


0 Comments