Hot Posts

6/recent/ticker-posts

राजमाता जिजाऊंच्या वंशजांकडून महाराणी येसुबाईंच्या वंशजांची पारिवारीक सदिच्छा भेट.

 

 • राजेशिर्के व राजेजाधव घराण्यांचा ऐतिहासिक, सामाजिक संवाद ;

      पुणे (प्रतिनिधि) : लोहगाव पुणे येथे दिनांक १७ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे सोयरे, राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ साहेबांचे वंशज, श्रीमंत लखुजीराजे शिक्षण संकुल संस्थेचे अध्यक्ष व सिंदखेड राजा पंचायत समितीचे माजी सभापती माननीय श्री. शिवाजीराव राजे जाधव (बापु ) यांनी ऐतिहासिक ठिकाण पेडगांव, किल्ले धर्मवीरगड येथील वंशज पत्रकार श्री लक्ष्मीकांत राजेशिर्के यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून घरगुती पारिवारिक चर्चा करत, पुणे येथील राजेशिर्के यांच्या प्रशिक्षण संस्थेच्या संपर्क कार्यालयात राजेशिर्के घराण्याची सदिच्छा भेट घेऊन घरगुती सुख दुःखासह विविध ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय विषयांवरही सविस्तर चर्चा केली. 

                 पुणे येथील भेटी दरम्यान श्रीमंत शिवाजी राजे जाधव यांनी महाराणी येसुबाई राजाऊ साहेब तथा स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजेशिर्के घराण्याचे वंशज, राष्ट्रवादीचे प्रदेश नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष माननीय दिपकराजे शिर्के यांच्याशी घरगुती चर्चा करत, राजेशिर्केंच्या परिवारात गेल्या ८ ते ९ महिन्यात ज्या दोन्ही दुःखद घटना झाल्या त्यावर बोलताना म्हणाले की, सिंदखेड राजा येथील राजे जाधव वंशज घराणे व ऐतिहासिक वंशज घराण्यातील सर्वच राजघराणे व सरदार घराण्यातील वंशज मंडळी राजेशिर्के वंशजांसोबत आहोत असा भावनिक धीर देत राजेशिर्के परिवाराला आधार दिला. भेटीप्रसंगी राजेशिर्केंची प्रसिद्ध असलेली लोहगाव- पुणे येथील साई डिफेन्स अँड पोलिस करियर प्रशिक्षण संस्थेची माहिती श्रीमंत शिवाजीराजे जाधव यांना दिली.

           

    याप्रसंगी प्रशिक्षण संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व श्रीमंत राजेशिर्के वंशज घराण्याच्या वतीने परंपरेने नुसार उपस्थित सर्व मान्यवरांचा आदर सन्मान केला. यावेळी राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीमंत राठोड, राजे जाधव यांचे सहकारी मित्र माननीय महेश पवार, शिवाजी गुंजाळ. रवी पंडीत, वाजेद खान आदींसह संस्थेचा स्टाफ, संस्था पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments