Hot Posts

6/recent/ticker-posts

तरुणांनी धर्मवीर छ. संभाजी महाराज बलिदान मास का पाळावाl -निलेश कांबळे(बोपोडी प्रमुख-शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान)

          पुणे (शशिकांत पाटोळे) | दिनांक ; २० फेब्रुवारी २०२६ : धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांचे जीवन धर्मासाठी जगण्याची  दिशा देणारे आहे. तरुणांच्यातील वाढते नैराश्य, वाढती व्यसनाधीनता कमी करणे तसेच धर्मवीर संभाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास समाजाचा समोर कसा मांडता येईल हे यंदाच्या बलिदान मासाचं उद्देश आहे. १८ फेब्रुवारी बुधवार पासून धर्मवीर शंभुराजे  प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व समस्त शिवशंभू भक्त बोपोडी यांच्यावतीने श्री. भैरवनाथ मंदिर बोपोडी गावठाण या ठिकाणी बलिदान मास‌‌ सुरु झाला आहे. निलेश कांबळे यांच्या वतीने उपस्थित सर्व शिवभक्तांना संबोधण्यात आले.

        धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांची पुण्यतिथी फाल्गुन अमावस्या दि. १८ मार्च २०२६ रोजी आहे. त्यापुर्वी, महिनाभर अगोदर धर्मवीर बलिदान मास पाळला जातो. धर्मवीर शंभुराजे  प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व समस्त शिवशंभू भक्त बोपोडी येथील श्री. भैरवनाथ मंदिर येथे दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ ते फाल्गुन अमावस्या १८ मार्च २०२६ पर्यंत रोज रात्री आठ वाजता छत्रपती श्रीसंभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि स्मरण करण्यात येणार आहे.

       औरंगजेबाने छत्रपती शंभुराजांना ४० दिवस वेदना देऊन हत्या‌ केली. याची या‌ महिन्यात जाणीव रहावी. म्हणून आवडीच्या वस्तूं गोड पदार्थांचा त्याग केला जातो.

        औरंगजेबाने छत्रपती ​शंभूराजांची ४० दिवस वेदनाकारक रित्या हत्या​ केली होती. म्हणून या कालावधीत संपूर्ण महिना सुखाचा त्याग करीत सूतकाचा महिना पाळला जातो. या दरम्यान, ४० दिवस गोड खायचे नाही. पायात चप्पल घालायचे नाही. जमिनीवर झोपायचे. अशा कृतीतून श्रदांजली व बलिदान मास पाळला जातो. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, युवती, महिला शिवप्रेमींनी यामध्ये सहभागी व्हावे. आणि रोज अभिवादन सभेला उपस्थित राहावे‌. असे आवाहन शिवभक्त श्री. निलेश कांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

         सध्या तरुणांच्यात परिक्षा, नोकरी, व्यवसाय, अपेक्षा, व्याधी आजारपण यातून आलेले नैराश्य, विविध प्रकारची व्यसनाधीनता झटकण्यासाठी बलिदान मास हे प्रभावी आहे. धर्मवीर बलिदान मास हिंदू समाजाला अंतरमुख करणारा, क्लेशकारक, दुःखदायक मास आहे. छत्रपती शंभू महाराज यांच्याएवढे दु:ख आपल्या जीवनात नाही. या बलिदान मास यातून देशासह प्रगतीला आणि कुटुंबिक जीवन‌ आनंदी जगण्यासाठी सुरू करण्याची हीच वेळ आहे.‌ याकाळात तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहासाचे वाचन करावे.

         औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा ४० दिवस शारीरिक छळ करून त्यांची क्रुरहत्या केली. स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी राजे मोठ्या धीराने मृत्यूला सामोरे गेले. मराठ्यांना या पराक्रमी शिवपुत्राचे अंत्यदर्शन ही घेता आले नाही. त्यांचे अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आले नाही. त्या भावनेतून हा बलिदान मास पाळला जातो. स्वतःच्या शरीराला क्लेश करून, आपल्या राजाला श्रद्धांजली वाहण्याचा हा मार्ग आहे. अनेक शिवभक्त, युवक आणि युवती या काळात याचे‌ आचरण करतात. हे खूप प्रेरणादायी आहे. छत्रपतींची शक्ती आणि मावळ्यांची छत्रपतींची प्रती असलेली भक्तीनिष्ठा ही व्यक्त करण्याची ही मोठी संधी आहे. हीच खरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली आहे.

          महिनाभर सुरू असलेल्या बलिदान मासाचा समारोप हा त्यादिवशी होणार आहे ज्या दिवशी औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा ४० दिवस अतोनात शारीरिक छळ करून क्रूर हत्या केली. मृत्यू पश्चात न निघालेली त्यांची अंतयात्रा, पुण्यतिथी फाल्गुन अमावस्या १८ मार्च या तारखेला मुख पदयात्रा काढून होणार आहे. असे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments