Hot Posts

6/recent/ticker-posts

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा.

 
       इंदापूर (प्रतिनिधी)-: इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब ता. इंदापूर महाविद्यालयांमध्ये 15 ऑक्टोबर रोजी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून मराठी विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


  
      कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय केसकर यांनी केले. यावेळी प्रा. कपिल कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना प्राचार्य डॉ. अशोक काळंगे मनाले की, वाचनामुळे व्यक्तीला ज्ञान मिळते आणि जीवनभर त्याचा उपयोग होतो. वाचन हे ज्ञानार्जनाचे एक महत्त्वाचे साधन आहे. डॉ. कलाम यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधना केली म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा केला जातो. असे त्यांनी नमूद केले.
    यावेळी मराठी विभागातील विद्यार्थी मोठे संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ.संदीप पवार ,प्रा. धुळदेव वाघमोडे प्रा. डॉ. रामचंद्र पाखरे, प्रा. बनसोडे मॅडम इ. प्राध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राम कांबळे यांनी केले तर आभार डॉ. राजकुमार शेलार यांनी केले.

Post a Comment

0 Comments