• कापड दुकानातून साड्या चोरणाऱ्या दोन महिलांना नांदेड येथून अटक.
• स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई
पुसद -(पुसद तालुका प्रतिनिधी) दि.12 / 10/25 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद शहर पोलीस स्टेशन अपराध क्रंमाक 545 / 2025 कलम 303 (2) भान्यासं या गुन्ह्याचा संमातर तपास करित असतांना नमूद पथकाने हिराणी बंधू कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता त्यामध्ये अज्ञात बुरखाधारी महिला दिसून आल्याने पोलीस कौशलाचा वापर करून गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती काढली की दिनांक 06/10/25 रोजी पुसद शहरातील हिराणी बंधू कापड दुकानात चोरो करणाऱ्या बुरखाधारी महिला ह्या नांदेड परिसरात असल्याबाबत माहिती संकलीत करून सदर बुरखाधारी अज्ञात महिलेचा शोध घेण्याकामी वरिष्ठांच्या परवानगीने नांदेड येथे जावून अज्ञात बुरखाधारी महिला ह्या (1) फरजाना बेगम शेख नईम वय 43 वर्ष (2) फईम बेगम हकिम खान वय 50 वर्ष दोन्ही रा श्रावस्ती नगर नांदेड असे असल्याचे निष्पन करून त्यांना नांदेड येवून ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला सर्वच्या सर्व 08 वेगवेगळ्या रंगाच्या साड्या किंमत 35000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करून घेतला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता ( भा पो से ) अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म पो से) सहायक पोलीस अधीक्षक त तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सपोनि /धिरज बांडे पोउपनि / शरद लोहकरे सफौ / मुन्ना आडे पोहवा / संतोष भोरगे पोहवा / तेजाब रणखांब पोहवा / सुभाष जाधव पोहवा / कुणाल मुंडोकार पोहवा / रमेश राठोड पोशि सुनिल पंडागळे चापोउनि / रविंद्र शिरामे पोशी / राजेश जाधव सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ मपोशि / जयाश्री श्रीरामजवार पो स्टे पुसद शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


0 Comments