• मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाला पिंपरी चिंचवडमधून पाठिंबा.
पिंपरी चिंचवड-: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पदयात्रेला सुरुवात केली आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मराठा सेवक सतीश काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे निघालेल्या आंदोलनाचा पहिला मुक्काम बीड पाटोदा येथे झाला. बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे दुसरा मुक्काम होणार आहे. गुरुवार दि. १७ सप्टेंबर रोजी हडपसर, पुणे येथे तिसरा मुक्काम तर शुक्रवार दि. १८ सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे चौथा मुक्काम होणार आहे.
शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर दाखल होणार असून तेथे आमरण उपोषण सुरू ठेवणार आहेत त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या निर्णायक लढ्यात पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ताकद द्यावी असे आवाहन मराठा सेवक सतीश काळे यांनी केले आहे.



0 Comments