Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राच्या थायबॉक्सिंग संघाचा राष्ट्रीय स्पर्धेत डंका !छत्तीसगडमध्ये ८ वी राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धा उत्साहात.

• महाराष्ट्र संघाने पटकावले प्रथम विजेतेपद, इसकी तेवरला उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान.

         पिंपरी-चिंचवड : छत्तीसगडमधील रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालयात ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान ८ वी राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धा पार पडली. देशातील २१ राज्यांतील तब्बल ६५० खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दमदार कामगिरी करत प्रथम विजेतेपद पटकावले. छत्तीसगडने द्वितीय, उत्तर प्रदेशने तृतीय क्रमांक मिळवला.

      या स्पर्धेत इसकी तेवर याने सुवर्णपदकासह उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू हा बहुमान मिळवला. पिंपरी-चिंचवड परिसरातील सार्थक मळेकर, श्रावणी राजपूत, जान्हवी साबळे, आर्यन शेंडगे, इसक्की तेवर, अमीन अत्तार, असिफ शेख, अजित जैस्वाल, सुरज भोंडे आणि कृष्णा दिवेकर यांनी सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राच्या विजेतेपदात मोलाची भर घातली.

       महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष विशाल माळी, सचिव अजय खेडगरकर आणि खजिनदार गणेश मांढरे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. स्पर्धेत नाझीम शेख, अमोल माने, वजीर शेख, हरिओम चव्हाण, शितल साबळे, प्रियंका अचमट्टी आणि शुभांगी सहारे यांनी पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली.

        यावेळी उपस्थित सर्वांचे पी.वाय.अत्तार थाई बॉक्सिंग इंडिया फेडरेशन अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले.


Post a Comment

0 Comments