Hot Posts

6/recent/ticker-posts

पीएमपी’ची महिलांसाठी खास भेट! महिलादिनी अवघ्या पाचशे रुपयांत सहल.

 

        पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; ७ मार्च २०२६ : जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) महिला आणि पर्यटकांसाठी विशेष भेट जाहीर केली आहे. स्वारगेट मुख्य बस स्थानकावरून येत्या ८ मार्च रोजी ८ प्रसिद्ध पर्यटन मार्गांवर विशेष वातानुकूलित ई-बस सेवा सोडण्यात येणार आहेत.

      अवघ्या ५०० रुपयांत पर्यटकांना दिवसभर निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांची सफर घडणार आहे.

         पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेता यावा, यासाठी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. या पर्यटन बससेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, ८ मार्च २०२६ रोजी महिला दिनानिमित्त खास ८ बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

-: असे आहेत विशेष पर्यटन मार्ग…

• मार्ग क्र. १..

      (हडपसर गाडीतळ) : कानिफनाथ गड, मोरगाव गणपती, जेजुरी आणि सासवड दर्शन. (वेळ : सकाळी ९ ते संध्याकाळी ६)

• मार्ग क्र. २...

      (हडपसर गाडीतळ) : सासवड (संगमेश्वर मंदिर), नारायणपूर (दत्त मंदिर), म्हस्कोबा मंदिर (कोडीत). (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०).

• मार्ग क्र. ५...

      (पुणे स्टेशन) : फ्लॉवर पार्क, पानशेत धरण, जंगल सफारी आणि पक्षी संग्रहालय. (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०).

• मार्ग क्र. ७..

       (पुणे स्टेशन) : वाडे बोल्हाई, तुळापूर (संभाजी महाराज समाधी), रांजणगाव गणपती, मोराची चिंचोली आणि पाबळ. (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०).

• मार्ग क्र. १२...

       (पुणे स्टेशन) : भुलेश्वर मंदिर, माळशिरस, प्रति त्र्यंबकेश्वर, सासवड (संगमेश्वर, चांगावटेश्वर) आणि बनेश्वर. (वेळ: सकाळी ८.३० ते रात्री ७).

• मार्ग क्र. ११...

      (स्वारगेट) : एकवीरादेवी मंदिर, कार्ला लेणी आणि लोणावळा परिसर. (वेळ: सकाळी ९ ते रात्री ७.३०).

• मार्ग क्र. ९...

     (स्वारगेट) : पौडगाव, श्री सत्य साईबाबा आश्रम, हाडशी, चिन्मय विभूती आणि कोळवण. (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०).

• मार्ग क्र. ६-

       (पुणे स्टेशन) : रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, दरेकर वाडा आणि यवत. (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३०).

• येथे करता येईल बुकिंग...

      पर्यटन बससेवेसाठी प्रतिप्रवासी ५०० रुपये तिकीट दर असून, डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, महापालिका भवन, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी आणि निगडी बसस्थानक येथील पास केंद्रांवर बुकिंग करता येईल.

Post a Comment

0 Comments