Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त संतनगर येथे भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन.


        • अभिषेक, याग-हवन, पालखी सोहळा, महाआरती व रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम

        मोशी (प्रतिनिधी) : संतनगर, मोशी प्राधिकरण येथील ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शुक्रवार दिनांक २० मार्च २०२६ रोजी विविध धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट व संघर्ष संस्था संस्थापक पंकजभाऊ पवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

            या दिवशी पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता श्री स्वामी महाराजांच्या अभिषेकाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वामी याग, होम व हवन या धार्मिक विधी पार पडणार आहेत. दुपारी १२ वाजता श्री स्वामी महाराजांचा जन्म सोहळा व पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

          दुपारी २ वाजता भव्य पालखी परिक्रमा सोहळा आयोजित करण्यात आला असून संतनगर परिसरात टाळ-मृदंगाच्या गजरात व भक्तांच्या जयघोषात स्वामी महाराजांची पालखी फिरविण्यात येणार आहे. या वेळी महिला मंडळे, युवक मंडळे तसेच मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता महाआरती व महाप्रसाद होणार असून त्यानंतर ७.३० वाजता स्वामी गीतांचा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

■ विशेष उपक्रम

▪ भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर

⏰ वेळ : सकाळी ९ ते दुपारी ४

       या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे तसेच आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

■ मान्यवरांची उपस्थिती...

       या कार्यक्रमास श्री योगी निरंजननाथ गुरु, हिंदुजनसूर्य श्री धनंजयभाई देसाई, श्री शेखरजी साने, शिवशंकर स्वामी व श्री सचिन गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच आमदार मा. श्री. महेशदादा लांडगे, श्री. पंकजभाऊ शिवाजी पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे.

■ आयोजकांचे आवाहन

       संतनगर, मोशी प्राधिकरण व परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments