
पिंपरी-चिंचवड : रोजगाराच्या शोधात उत्तरप्रदेशमधून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या महेंद्र कुमार या तरुणावर कामाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी अपघात ओढवला. इंडस्ट्रियल पत्रा शेड उभारणीच्या कामादरम्यान क्रेनने उचललेल्या लोखंडी पाईपचा ओव्हरहेड विद्युत वाहिन्यांशी संपर्क आल्याने पाईपमध्ये विद्युत प्रवाह आला. त्या वेळी पाईप दोन्ही हातांनी पकडलेल्या महेंद्र कुमार यांना जोरदार विद्युत धक्का बसून ते गंभीररीत्या भाजले गेले.
संदीप चव्हाण यांनी तत्काळ सुमारे ४० हजार रुपयांची आर्थिक मदत करून महेंद्र कुमार यांच्या उपचारासाठी मोलाचा हातभार लावला. तसेच, संबंधित रुग्णालयाचे बिल कमी करून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. सलग चार दिवस स्वतः लक्ष ठेवून त्यांनी जखमी तरुणाची काळजी घेतली.
याचबरोबर,अल्प दरात ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून महेंद्र कुमार यांना सुरक्षितपणे त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची सोय देखील करण्यात आली. एका अनोळखी, निराधार रुग्णाला दिलेल्या या मदतीमुळे समाजातील माणुसकीचे जिवंत उदाहरण समोर आले आहे.
संदीप चव्हाण यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून,त्यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचत आहे.

0 Comments