पुणे; दि.११ (शशिकांत पाटोळे) : नो पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या वाहतूक पोलिसांकडून किंवा महानगरपालिकेच्या वतीने उचलल्या जातात. अशा टोइंग व्हॅनने एक स्कूटर उचलला मात्र त्यावर दुचाकीस्वार तसाच बसलेला होता. तो खाली उतरतच नव्हता, त्यामुळे त्याला तसाच उचलून नेल्याचा प्रकार घडला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातला असल्याचा दावा केला जातोय.
Ghar Ke Kalesh या एक्स अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. या युजरने सदरील व्हिडीओ पुण्यातला असल्याचा दावा केलाय. व्हायरल व्हिडीओमध्ये एक पांढरा स्कूटर टोइंग व्हॅनने उचलून चालवला आहे. आजूबाजूला लोक बघत आहेत.
स्कूटरसोबतच हा व्यक्ती टोइंग व्हॅनमध्ये बसला. आजूबाजूचे लोक आश्चर्याने बघत असल्याचं दिसतंय. व्हायरल झालेला व्हिडीओ नक्की पुण्यातला आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही. मात्र तसा दावा केला जातोय. सध्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांवर कारवाई केली जात आहे.
दरम्यान, मंगळवारी पुणे शहरातील रस्त्या-रस्त्यावर आणि चौका-चौकात पोलिस उभे होते. पोलिसांनी ट्रिपलसीट प्रवास करणाऱ्या दुचाकींवर कारवाई केली. शिवाय अनधिकृतपणे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरही दंड ठोकला. पुणे वाहतूक पोलिसांनी सध्या कारवाईचा बडगा उगारला आहे.

0 Comments