Hot Posts

6/recent/ticker-posts

दापोडीत गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक.


         • अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई;२८,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

       पिंपरी-चिंचवड दि. ०८ (शशिकांत पाटोळे) : दापोडी पोलीस ठाणे हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक केली आहे. ही कारवाई दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ८.१० वाजण्याच्या सुमारास बोपोडी ते दापोडी रोडवर आदिती हॉटेल जवळ सर्वे नं. ८०/१ येथील मोकळ्या जागेच्या भिंतीलगत करण्यात आली.

        याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ३४/२०२६ अन्वये एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब) (ii) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ०२.२५ वाजता आरोपीस अटक करण्यात आली.

       अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सचिन वसंत कांबळे (वय ३३ वर्षे, धंदा - खाजगी नोकरी, रा. राजू काटे यांचे खोलीत, सरस्वती अनाथ आश्रम जवळ, अ. काटे चाळ, दापोडी, पुणे) असे आहे.

        आरोपीकडून एकूण २०८ ग्रॅम वजनाचा गांजा (अंदाजे किंमत २८,४०० रुपये) तसेच २ मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा सदर अमली पदार्थ अनधिकृत व बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Post a Comment

0 Comments