Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्ञानेश्वर माऊली मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर सेवादल अध्यक्ष पदी निवड.


  • आदरणीय अजितदादांवर असलेली निष्ठा व पक्षाचे स्थापनेपासून केलेल्या कामांची दखल घेऊन पक्षाकडून मोरे यांना शहराध्यक्ष पदाची संधी...

       पिंपरी (प्रतिनिधी)-: पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. पक्षाच्या नेत्या तसेच राज्याच्या उप मुख्यमंत्री मा.सुनेत्रावहिणी पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे हे पक्ष स्थापनेपासून काम करत असून त्यांनी पक्षाची विविध पदे भूषवली आहेत, तसेच त्यांना गेले ०९  वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शहर फेरिवाला समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ही सर्व पदे अजितदादांमुळे मिळाली असे त्यांनी यावेळी सांगितले. 

        शहराध्यक्ष पदावर काम करत असताना, पिंपरी चिंचवड शहराची कार्यकारणी राज्यात सर्वात मोठी व कार्यक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच सुनेत्रावहिणी आणि पार्थदादां सोबत भक्कमपणे उभे राहून पक्ष वाढीसाठी अजितदादांचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत असे मोरे म्हणाले.

        

Post a Comment

0 Comments