
इंदापूर (वार्ताहर श्री गणेशराव धनवडे) 10 जानेवारी वार शनिवार रोजी स्थळ निमगाव केतकी वेळ 12-30वाजता जागतिक हिंदी दिनाचे औचित्य साधून इंदापूर हिंदी अध्यापक संघाच्या वतीने 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवसा निमित्त घेण्यात आलेल्या हिंदी निबंध स्पर्धेत मध्ये प्रत्येक शाळेत तीन क्रमांक तीन गटातून काढण्यात आले प्रत्येक शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रत्येक शाळेतील उपक्रमशील शिक्षक यांचा फुल, श्रीफल, शाल व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी 10 आदर्श हिंदी शिक्षक व 45 उपक्रमशील शिक्षक यांना पुरस्कार देण्यात आले तसेच पाच निवृत्त शिक्षक व शिक्षकांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला .यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख श्री कैलास जाधव सर सदस्य अनुदान समिति नई दिल्ली यांनी हिंदी विषयाचे महत्त्व व वर्तमान हिंदीचा वापर हिंदीचे व्यवहारातील महत्त्व सांगितले तसेच इंदापूर हिंदी अध्यापक संघाने केलेल्या कार्याबद्दल प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार श्री दत्तात्रय सावंत यांनी संघाच्या कार्याबाबत संघाच्या संघाचे पदाधिकारी यांच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले इंदापूर हिंदी अध्यापक संघ अध्यक्ष श्री के डी भोंग सर यांनी आपल्या प्रास्ताविकात संघाचे कार्य विस्तृतपणे सांगितले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री जे एन पाटील सर मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री सी टी कोकाटे सर ,श्री शिरसाट सर श्री माने सर ,छत्रपती शिवाजी छत्रपती हायस्कूल भवानी नगरचे श्री रमेश मचाले सर, श्री उस्मान मुलाणी सर ,श्री सुधाकर भोंग सर, श्री राजेंद्र रणमोडे सर उपाध्यक्ष श्री डी जे निंबाळकर सर कार्याध्यक्ष श्री डी व्ही वाघ सर उपस्थित होते कार्यक्रमास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना श्रीमती मनीषा भोसले मॅडम यांनी अल्पोपहार दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वर्षा गाडे मैडम यांनी केले त्यांना सहकार्य श्री शब्बीर मुलांणी ,श्री मिनानाथ कोटे सर, श्री संजीव पांढरे सर,श्री शहंशाह मुजावर यांनी केले
कार्यक्रमाच्या आभार श्री राजेन्द्र रणमोडे सर यांनी मानले.
0 Comments