
• सामाजिक कार्यकर्ते पंकज भाऊ पवार यांच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम..
मोशी -: अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ व संघर्ष संस्था संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ पवार यांच्या माध्यमातून संत नगर मोशी प्राधिकरण सेक्टर नंबर चार ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरामध्ये अतिशय उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणामध्ये दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने विधायक काम म्हणून भव्य असं रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिर मध्ये मोठ्या संख्येने भक्ताने रक्तदान देखील केलं. हिंदू धर्मामध्ये दान करणे याला खूप महत्त्व आहे त्यामध्ये अन्नदान असेल रक्तदान असेल व अन्य अनेक प्रकारचे दान आहेत त्यामध्ये संस्थेचा एक स्तुत्य उपक्रम रक्तदान शिबिर दत्त महाराजांचा जन्म सोहळा सर्व माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये तसेच परिसरातील शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली व सायंकाळी महाआरती महारथीला उपस्थित उद्योजक संजयजी चौधरी सिने अभिनेत्री विघ्नेशा गवारी अभिनेत्री आर्या घारे स्थायी समिती माजी चेअरमन विलास मडगिरी माजी जेजुरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तुषार भाऊ सहाने माजी शिक्षण सभापती विजुभाऊ लोखंडे व अन्य मान्यवर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान सेवा या संस्थेच्या माध्यमातून कायम या ठिकाणी करण्यात येत असते दत्त जयंतीच्या निमित्ताने देखील मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पंकज भाऊंच्या माध्यमातून या परिसरामध्ये अध्यात्मिक वातावरण निर्माण झालेलं आहे अशी लोकांची या ठिकाणी अतिशय प्रामाणिक भावना निर्माण झालेली आहे प्रसन्न वातावरणामध्ये आध्यात्मिक वातावरणामध्ये कार्यक्रम पार पडला.

0 Comments