Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघ प्रणित वधूवर कक्ष जिल्हाध्यक्ष पदी वसंतराव पाटील.


      पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी)-: मराठा सेवा संघ पुणे जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिजाऊ सभागृह आकुर्डी येथे गुरुवार दिनांक ११ रोजी संपन्न झाली. यावेळी मराठा सेवा संघ पुणे विभागीय अध्यक्ष डाॅ.रामकिशन पवार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

         या वेळी मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची मराठा सेवा संघ प्रणित वधूवर कक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.त्यांना विभागीय अध्यक्ष डाॅ.रामकिशन पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.  

        वसंतराव पाटील हे गेल्या तीस वर्षांपासून विविध सामाजिक संघटनांमधे कार्य करत आहेत. यावेळेस मराठा सेवा संघाचे डाॅ.रामकिशन पवार, आबासाहेब ढवळे,संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे दिलीप गावडे,सत्यशील जाधव,सुदाम शिंदे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments