Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त दुबार मतदार यादी प्रसिद्ध.


        पिंपरी, २० नोव्हेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील दुबार मतदारांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या निवडणूक विभागाला प्राप्त झाली आहे, अशी माहिती महापालिका निवडणूक विभागातून देण्यात आली आहे.

       नागरिकांना सदर यादी पाहण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले सभागृह आणि महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये असणाऱ्या निवडणूक विभागात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना ही यादी महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.pcmcindia.gov.in येथेही अपलोड करण्यात आली आहे. या यादीत मतदारांची नावे अनुक्रमांक १ पासून सुरू होत असून यादीतील शेवटचा अनुक्रमांक हा ९२ हजार ६६४ आहे,अशी माहिती देखील निवडणूक विभागातून देण्यात आली.

Post a Comment

0 Comments