सातारा जिल्हा प्रतिनिधी -: पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील कल्याण रेल्वे स्टेशन (ठाणे-जि.ठाणे), दापोडी (माहिम पोलीस ठाणे-मुंबई), कुंभार रेल्वे पोलीस ठाणे (मुंबई), अंबरनाथ पोलीस ठाणे (ठाणे-नाशिक) यांसह एकूण १० ठिकाणी चोरी, सोन्याचे दागिने हिसकावण्याचे गंभीर गुन्हे करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला सातारा जिल्हा पोलिसांनी जेरबंद केली आहे. अटक केलेल्या सहा आरोपींकडून तब्बल ६ लाख ८० हजार रुपये किंमतीचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.
• नेमकं काय घडलं?
दिनांक २०/०१/२०२५ रोजी सकाळी १०:४५ ते दुपारी १२:०० च्या दरम्यान सातारा येथील एसटी स्टँडवर बसमधून उतरून एका महिलेच्या हातातील बॅग हिसकावून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
• तपासाची सूत्रे!
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर यांनी तातडीने तपास पथके नेमली.
पोलीस पथकांने गुन्ह्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर आरोपींना ताब्यात घेतले.
या आरोपींनी पुणे, मुंबई, ठाणे-नाशिक रेल्वे मार्गावरील विविध पोलीस ठाण्यांतर्गत केलेल्या १० गंभीर चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
• आरोपी कोण?
अटक करण्यात आलेल्या एकूण ०६ आरोपींची नावे आणि पत्ते खालीलप्रमाणे आहेत. १ (पूनममा सुरेश तिडगे) वगळता एकूण ०५ आरोपी फरार आहेत.
१) सूरज सुरेश तिडगे (वय २३ वर्षे, रा. वांद्रेपाडा, सुभाषवाडी, अंबरनाथ वेस्ट)
२) हरीष शिवाजी जाधव (वय २४ वर्षे, रा. वांद्रेपाडा, सुभाषवाडी, अंबरनाथ वेस्ट)
३) अमित चंदन गमगे (वय २७ वर्षे, रा. कैलासनगर, फडके रोड, अंबरनाथ वेस्ट)
४) अभिषेक चंदन गमगे (वय २४ वर्षे, रा. फातिमा चर्चचे पाठीमागे, अंबरनाथ वेस्ट)
५) सुमित कैलास गमगे (वय २४ वर्षे, रा. पंचशिलनगर, हसिंग सोसायटी, सुभाष टेकडी, उल्हासनगर)
६) पूनममा सुरेश तिडगे (वय २४ वर्षे, रा. वांद्रेपाडा, सुभाषवाडी, अंबरनाथ वेस्ट)
या टोळीमध्ये मुंबई-ठाण्यातील स्थानिक गुन्हेगार तसेच राजकारणी व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्यावरही लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
यशस्वी टीम
या महत्त्वपूर्ण कारवाईत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर भुईंज पोलीस ठाणेचे पोलीस स.पो.नि. पृथ्वीराज ताटे उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या पथकांतील पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, सातारा पोलिसांनी दाखवलेल्या कार्यक्षमतेबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक करून देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील शिंगाडे स्थानिक गुन्हे शाखा तसेच भुईंज पोलीस ठाणेकडील नितीन जाधव सोमनाथ बल्लाळ सागर मोहिते किरण निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखेकडील अमोल माने राकेश खांडके स्वप्नील दौंड सचिन ससाणे रविराज वर्णेकर आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

0 Comments