या उपक्रमात —✨ कष्टकरी व गरजू महिलांना २०० हून अधिक साड्यांचे वाटप करण्यात आले.त्या साड्या स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होता.✨ गरजू मुलींना ड्रेस,✨ शेतमजुरांना शर्ट-पँट,✨ लहान मुलांना मिठाई व वह्या,
नवीन जन्माला आलेले मुलं हे देशाचं भविष्य आहेत. त्यांना आज चांगलं वर्तमान देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, जेणेकरून उद्याचा उज्ज्वल भविष्य तयार होऊ शकेल. आरोग्य संपदा ह्या उपक्रमा अंतर्गत नवीन जन्म झालेल्या बालकांसाठी बेबी किट वाटप करण्यात आले.तसेच गावातील प्रत्येक घरात उजेड पसरावा म्हणून पाण्यावर चालणाऱ्या दिव्यांचे वाटप करण्यात आले. फराळाचा आनंद सर्वांनी एकत्र घेतला आणि खऱ्या अर्थाने “माणुसकीचा सण”साजरा झाला.
या कार्यक्रमाला नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव, कविता तिजारे, भारती जाधव, कोपूर्ली खुर्द या गावाच्या सरपंच सरपंच - मनीषा पालवी, ग्रामपंचायत सदस्य, मधुकर पालवी, हेमराज जाधव, मीनाताई तरवारे, युवराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भिकाजी चौधरी, गिरीशजी गावित, युवराज पालवी, बाम्हणे सर, संतोष तरवारे,सोमनाथ नाठे आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे खजिनदार संदीप देव यांनी विशेष परिश्रम घेतले.
🌟 “दिवा केवळ घर उजळत नाही, तो माणुसकीचा प्रकाश पसरवतो — आणि तोच प्रकाश नमस्ते नाशिक फाउंडेशन दरवर्षी समाजात उजळवत आहे.” 🌟









0 Comments