Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा समाजाच्या महिलांचे चरित्र हनन करणारे व्हिडिओ बनवणाऱ्या संगीता वानखेडे वर अदखलपात्र गुन्हा.

 

        • अखंड मराठा समाजामध्ये संगीता वानखेडे विरोधात असंतोषाचे वातावरण.

     भोसरी -: मराठा समाज महाराष्ट्रभरातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे गेला होता. याच घटनेला धरून मराठे आंदोलनाला गेले असताना तुमच्या बायकांसोबत दुसरे झोपून जातात मजा मारून अशा प्रकारचे मराठा स्त्रियांची बदनामी करणाऱ्या अपशब्द बोलू व्हिडिओ तयार करून संगीता वानखेडे या बाईने तिच्या पर्सनल फेसबुक अकाउंट तसेच स्पष्ट मत या यूट्यूब चैनल वर हा बदनामी कारक व्हिडिओ पोस्ट करून तमाम मराठा समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. 

            या निंदनीय घटनेमुळे संगीता वानखेडे विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली होती. यामुळे संगीता वानखेडे राहणार देव सिटी सहकारी गृह रचना संस्था मर्यादित सेक्टर नंबर ११ प्लॉट नंबर १४५ मर्सिडीज ब्रेंझ चौक स्पाईन रोड मोशी प्राधिकरण पुणे हिच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन भोसरी येथे शेकडो मराठा समाजाचे कार्यकर्ते तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये थांबून कठोर कारवाई करण्याची मागणी करत होते. 

      मराठा समाजाचा तीव्र रोष लक्षात घेता अखेर एमआयडीसी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतिश भास्कर काळे यांच्या तक्रारीवरून कलम ३५६ (२) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

      पोलिसांनी संगीता वानखेडे वर अदखलपात्र गुन्हा नोंदविला असल्याने उपस्थित मराठा समाजामध्ये अतिशय नाराजीचे वातावरण होते. यामुळे पोलिसांनी संबंधित महिलेवर लवकरच कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देत उपस्थितांना समजवण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी संगीता वानखेडे वर मराठा समाजाची बदनामी केली म्हणून संबंधित पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही तर येत्या काही दिवसात सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात येईल व या आंदोलनास महाराष्ट्रभरातून मराठा समाजाला हाक दिली जाईल असा निर्धार उपस्थित मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. 


   संगीता वानखेडे वर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याच्या मागणीसाठी नाशिक येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते चेतन शेवाळे यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड शहरातील समन्वयक वैभव जाधव जीवन बोराडे सागर तापकीर विश्वास टेमगिरे संतोष काळे आप्पा चांदवडे रावसाहेब गंगाधरे शरद पोखरकर नरेंद्र मुर्हे राहुल गरड विजय गुंजाळ विलास येवले मीरा कदम वृषाली साठे सुनिता शिंदे सुषमा बडे जया गवळी वैशाली यादव यांच्यासह शेकडो मराठा कार्यकर्ते उपस्थित होते. 

     पोलीस आयुक्तालयावर मोर्चाची तारीख लवकरच कळवण्यात येईल असे मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवडच्या वतीने सांगण्यात आले..

Post a Comment

0 Comments