Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्रचा पहीला क्रमांक, पिंपरी चिंचवड च्या खेळाडूंचा सिंहाचा वाटा.

 
       पिंपरी चिंचवड -: नुकत्याच वाराणसी, उत्तर प्रदेश येथे दि 29 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

      या स्पर्धेत संपूर्ण भारतातून 16 राज्य व  500 हुन अधिक खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत पहीला क्रमांक महाराष्ट्र, दुसरा उत्तर प्रदेश, तर तिसरा छत्तीसगढ या राज्याने मिळविला. 

    स्पर्धेत पिंपरी चिंचवड येथील खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून अनेक पदके पटकावले, त्यामध्ये असिफ शेख, सुवर्ण पदक पटकावित स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू ठरला . 

        तसेच इसक्की तेवर(सुवर्ण पदक), सुरज भोंडे (सुवर्ण पदक),  अमिन आत्तार (सुवर्ण पदक), कृष्णा दिवेकर(सुवर्ण पदक),अजित जैस्वाल (सुवर्ण पदक) संजना हिवरकर (सुवर्ण पदक), तेजस वारूळकर (सुवर्ण पदक),  अतिक शेख (सुवर्ण पदक) हेमंत सिंग (रौप्य पदक) स्पर्धेचे प्रमुख पाहुणे श्री. पी वाय आत्तार सर, अध्यक्ष राष्ट्रीय थायबॉक्सिंग असोशिएशन, मंत्री श्री दया शंकर यांच्या हस्ते खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले व शुभेच्छा दिल्या.

     ्महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर श्री वजीर शेख सर यांचे खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले,स्पर्धेत उत्कृष्ट पंच म्हणून नाझीम शेख सर, अरूणा हिवरकर मॅडम, प्रियंका अचमट्टी मॅडम, श्री किरण माने सर, यांनी कामगिरी पाहीली.

      तर महाराष्ट्र थायबॉक्सिंग असोशिएशन कार्याध्यक्ष श्री विशाल माळी सर, महाराष्ट्र थायबॉक्सिंग असोशिएशन सचिव श्री अजय खेडगरकर सर, महाराष्ट्र थायबॉक्सिंग असोशिएशन खजिनदार श्री गणेश मांढरे सर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments