मोशी (प्रतिनिधी)-: सलग २४ वर्षांपासून संत नगर येथे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. संघर्ष सेवा पतिष्ठान व ब्रह्माण्डनायक स्वामी समर्थ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणेश उत्सव २०२५ यंदाही भक्ती, संस्कृती आणि आनंदाच्या झगमगाटात उत्साहपूर्ण पार पडला. या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री. पंकज शिवाजी पवार यांनी केले.
१ सप्टेंबरला फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि Mrs. Sant Nagar हा विशेष उपक्रम झाला. २ सप्टेंबर रोजी लहान मुलांनी सादर केलेल्या नाटकाने प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेषतः "हुंडा बळी" या सामाजिक विषयावरचे सादरीकरण सर्वांसाठी विचार करायला लावणारे ठरले. दर्जेदार अभिनयामुळे हा कार्यक्रम सर्वांच्या विशेष लक्षात राहिला.
महिलांसाठी ३ सप्टेंबर रोजी आयोजित विशेष मानाची पैठणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध खेळ व उपक्रमांमध्ये महिलांनी सक्रिय सहभाग घेतला आणि कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.
४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाचा समारोप भव्य मिरवणुकीने करण्यात आला. धार्मिक विधी तसेच मुला-मुलींच्या कलागुणांना वाव देणारे स्पर्धात्मक कार्यक्रम यामुळे यंदाचा गणेशोत्सव सर्वार्थाने अविस्मरणीय ठरला.



0 Comments