Hot Posts

6/recent/ticker-posts

धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दुर्गा माता दौड बोपोडी मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली.

 

      पुणे : नवरात्रोत्सव काळात प्रतिवर्षी धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दुर्गा माता दौडचे बोपोडी मध्ये आयोजन केले जाते. यावर्षी नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळीचे औचित्य साधून श्री दुर्गा माता दौड चे आयोजन करण्यात आले होते. 

     श्री भैरवनाथ मंदिर बोपोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीस श्री. मिलिंदभाऊ एकबोटे अखिल कृषी गोसेवा प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व सौ सुरेखाताई बल्लाळ संयोजिका विश्व हिंदू परिषद प्रांत दुर्गामाता शक्ती तसेच बोपोडी भागातील नामांकित वकील श्री रमेशजी पवळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रेरणा मंत्राने या दोड चा प्रारंभ झाला. 

    

       मोठ्या संख्येने धारकरी, वीर बजरंगी, सशस्त्र हिंदू धर्मप्रेमी दुर्गा आणि मातृशक्ती या दोडमध्ये सहभागी झाल्या होत्या. जागोजागी सुवासिनींनी रांगोळ्या काढून आणि औक्षण करून श्री दुर्गा माता दौड चे मोठ्या उत्साहात स्वागत केले. पदपथात येणाऱ्या प्रत्येक मंदिरामध्ये आरत्या करून श्री भैरवनाथ मंदिर बोपोडी गावठाण येथे श्री. मिलिंदभाऊ एकबोटे यांच्या भाषणाने सांगता करण्यात आली. त्यांनी आपल्या भाषणामध्ये या दौडच्या माध्यमातून संपूर्ण बोपोडीतील ग्रामस्थांना जागृत करण्याचं चांगला उपक्रम केल्याबद्दल आयोजक श्री. निलेशभाऊ कांबळे अध्यक्ष धर्मवीर शंभुराजे प्रतिष्ठान व त्यांना या कामात सहकार्य करणाऱ्या तमाम हिंदू सेवकांचे त्यांनी अभिनंदन केले. 

     त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाले शिवाजी आणि संभाजी हे केवळ शब्द नाहीत तर ते हिंदू धर्माचे मूलमंत्र आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. देशासाठी कसं जगावं हे शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि देशासाठी कसं मरावं हे संभाजी महाराजांकडून शिकावं. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आदर्श आपण नेहमी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. या शब्दांत त्यांनी सर्वांना संबोधित केले. व अशाप्रकारे त्यांच्या भाषणाने कार्यक्रमांची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments