सतीश काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सत्ता मिळवण्यासाठी छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन ‘चला देऊ मोदींना साथ’ अशी मोहिम छेडली. पण आता त्याच शिवछत्रपतींच्या प्रतिमांना कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ व सार्वजनिक शौचालयांच्या भिंतीवर लावून अपमान केला जात आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे चिखल पाणी उडत आहे, अशा ठिकाणी महाराजांचे पोस्टर्स झळकत आहेत. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे.” या प्रकारामुळे महाराष्ट्रातील जनमानसात तीव्र संताप आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून ते महाराष्ट्राची संस्कृती, अभिमान आणि अस्मिता आहेत. त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही सन्मानाने केली पाहिजे, ही अपेक्षा आहे. मात्र सध्याच्या प्रकाराने जनतेच्या भावना दुखावल्या असून, सामाजिक आणि राजकीय पातळीवर याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.दरम्यान, प्रसिद्धीच्या हव्यासापायी छत्रपतींचा असा अपमान का सहन करावा लागत आहे? तसेच जिथे लोक थुंकतात, कचरा टाकतात, तिथेही महाराजांचे पोस्टर लावून त्यांची विटंबना करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा प्रकार मुद्दाम घडवला गेला आहे का? "याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली भूमिका का जाहीर करीत नाहीत? असा सवाल संभाजी ब्रिगेडने उपस्थित करीत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून, मुख्यमंत्र्यांनी आपली तातडीने भूमिका जाहीर करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. छत्रपतींच्या प्रतिमांचा अवमान सहन केला जाणार नाही." येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा इशाराही संभाजी ब्रिगेडने निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते जिल्हा कार्याध्यक्ष वैभव जाधव सचिव नकुल भोईर संघटक गणेश देवराम यांच्या सह्या आहेत.


0 Comments