• विनापरवाना पोस्टर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी)-:पिंपरी चिंचवड शहरात भुयारी मार्ग शेजारील भिंती अस्वच्छ ठिकाणे महत्वाच्या जागा या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज त्यांची राजमुद्रा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले पोस्टर चित्र लावलेले आहेत काही ठिकाणी समाजकंटकांकडून पान गुटखा खाऊन पोस्टर वर पिचकाऱ्या मारल्याचे आढळून आले आहे ही गंभीर बाब असून, अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना झाली आहे.
यामुळे शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे कडे याविषयी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्त यांना संबंधितांवर गुन्हे दाखल करून पोस्टर लावणारे व विटंबना करणारे यांना अटक करावी यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी शिवप्रेमींनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांचेकडे निवेदनातून केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संबंधितांकडून देण्यात आला आहे.या बाबतचे निवेदन महानगरपालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्त यांना देण्यात आले आहे.
सदर मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड तसेच शहरातील विविध शिव शाहू फुले आंबेडकरवादी विचारांच्या संघटनांच्या वतीने सतिश काळे प्रकाश जाधव मारूती भापकर धनाजी येळकर वैभव जाधव नकुल भोई गणेश पाटील सुलभा यादव सुनिता शिंदे वसंत पाटील लक्ष्मण रानवडे शितल मोरे विष्णू बिरादार नरेंद्र बनसोडे राजू पवार यांनी दिले आहे यावेळी या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकच्या पायर्यावर बसून काही काळासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments