Hot Posts

6/recent/ticker-posts

"स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण" महाराष्ट्राचा अभिमान; पण संविधान भवनाचं काय झालं?

    • सुनिल कांबळे, सचिव, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), पिंपरी चिंचवड शहर यांचा सवाल! 

      पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी)-: पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक राजधानी असतानाच आता ऐतिहासिक स्मारकांनीही ओळखलं जाऊ लागलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रम, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक. त्यांच्या स्मारकाचे उभारणीचे काम म्हणजे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हे स्मारक पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणार आहे. याबाबत आमदार महेश लांडगे यांचे अभिनंदन करणे आवश्यक आहे. मात्र, याचसोबत आता एक अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे –

👉 संविधान भवनाचं काय झालं? निवडणुकीपुरते आश्वासन की जनतेशी फसवणूक?

    गेल्या दोन विधानसभेच्या निवडणुकांमध्ये संविधान भवनाचे गाजावाजा करून आश्वासन देण्यात आले. जाहीरनाम्यांतून, प्रचारसभांतून मोठ्या थाटामाटात घोषणा करण्यात आल्या. पण निवडणुका संपताच संविधान भवनाचा विषय गायब झाला. आजवर कोणतीही ठोस हालचाल, प्रशासकीय मंजुरी, निधी वितरण किंवा कामाची सुरुवात झालेली नाही.

     हे नेमकं काय चाललं आहे? संविधान भवन हा केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी वापरलेला जाहीरनामा-पुरता शब्दांचा खेळ होता का?

• जनतेशी केलेलं आश्वासन म्हणजे फसवणूक

    संविधान भवन ही केवळ एक इमारत नाही, तर ती जनतेच्या न्यायाच्या, समानतेच्या आणि अधिकारांच्या लढ्याचं प्रतीक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा गौरव आणि अभ्यास यासाठी हा प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे.

मग निवडणुकीत दिलेलं वचन फक्त मतांसाठी होतं का?

आमदार महेश लांडगे यांनी संविधान भवनाची वाट का लावली?

शहरातील संविधान प्रेमी जनता मूर्ख आहे का, की निवडणुकीनंतर तिची आठवण राहत नाही?

• प्रशासन आणि आमदार यांच्यावर जबाबदारी

     प्रशासनाने आणि आमदारांनी या विषयावर ठोस भूमिका घ्यावीच लागेल. निवडणुका आल्या की स्मारकांची आठवण होते, निवडणुका गेल्या की सर्व विषय दडपला जातो – हे चित्र जनतेने आता सहन करायचं नाही.


👉 आम्ही स्पष्ट सांगतो –

     संविधान भवनाच्या कामाचा ठोस रोडमॅप, निधी आणि कालमर्यादा जाहीर न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.

    आमदार महेश लांडगे यांनी या विषयावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा त्यांच्या शांततेला जनता विश्वासघात समजेल. संविधान भवन हा फक्त राजकीय स्टंट नव्हे तर समाजाच्या आत्म्याचा प्रश्न आहे.

• जनतेला प्रश्न आणि इशारा

     आज संविधान भवन हा विषय निवडणूक जाहीरनाम्यातून गाजावाजा करून गायब का झाला?

👉 आमदार महेश लांडगे यांनी तात्काळ उत्तर दिलं नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. संविधानाचा अपमान आम्ही सहन करणार नाही.

     छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक जसे आपल्या शौर्याचे प्रतीक असेल, तसेच संविधान भवन हे आपल्या न्याय, समानता आणि अधिकारांचे प्रतीक असणे आवश्यक आहे. दोन्ही प्रकल्प तितकेच महत्वाचे आहेत.

👉 संविधान भवनाशिवाय शहराचा विकास आणि सामाजिक न्याय अपूर्ण आहे.

Post a Comment

0 Comments