Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड पोलीस दलात न्यायसाहाय्यक वैदयकिय पथक व व्हॅन दाखल

 

        पिंपरी चिंचवड -: दिनांक ०१/०७/२०२४ पासुन संपुर्ण देशात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम या नवीन कायद्यांची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. नवीन कायदा अंमलात आणण्याचे विविध उद्देशांपैकी गुन्हेसिध्दीचे प्रमाण वाढविणे हा एक प्रमुख उद्देश आहे.

      त्यासाठी गुन्हयाचे तपासात भौतिक, जैविक व इतर पुरावे शास्त्रोक्त पध्दतीने गोळा करुन ते न्यायसहाय्यक वैदयकिय प्रयोगशाळेत वेळेत तपासणीसाठी पाठविणे हा एक महत्वाचा भाग आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १७६ (३) मध्ये, ज्या गुन्हयांना कायद्यात सात वर्षे व त्यावरील कालावधीची कैदेची शिक्षा सांगितलेली आहे, अशा गुन्हयांचे तपासात न्यायसाहाय्यक वैद्यकिय पथक यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन पुरावे गोळा करण्याबाबत तरतुद नमुद केलेली आहे. त्याअनुषंगाने सदर कार्यवाहीसाठी अशा पथकांची आवश्यकता होती.

       महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील सर्व पोलीस घटकांसाठी न्यायसाहाय्यक वैद्यकिय पथक व त्यासाठी लागणाऱ्या साधनांनी सुसज्ज अशा व्हॅन दिलेल्या आहेत. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस दलात दिनांक २७/०८/२०२५ रोजी असे एक पथक व्हॅनसह दाखल झाले असुन त्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या हस्ते पार पडले आहे. सदर व्हॅनमध्ये पुढील सविधा उपलब्ध असुन त्यावर कामकाज करणेसाठी सहा न्यायसाहाय्यक वैदयकिय तज्ञ नेमण्यात आलेले आहेत.

       व्हॅनमध्ये एनडीपीएस, डीएनए, पावलांचे ठसे घेण्याचे, सायबर तपासणी, आग व स्फोटक तपासणी, बुलेट टेस्टींग व जीएसआर टेस्टींग, बलात्काराच्या केससाठी रक्त व वीर्य तपासणी, रक्ताचे नमुने तपासणी इत्यादींचे किट उपलब्ध असणार आहे. त्याद्वारे विविध प्रकारचे पुरावे घटनास्थळावरुन तपासकामी शास्त्रोक्तोपध्दतीने गोळा केले जाणार आहेत. या सर्व समावेशक सुविधेमुळे पुरावे त्वरीत संकलीत होतील, अचुक विश्लेषण होईल आणि पोलीसांना या उपक्रमामुळे गुन्हयांचा तपास अधिक सुलभ, कार्यक्षम व वैज्ञानिक पध्दतीने होणार आहे. परिणामी गुन्हयांचे

     दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्यास हातभार लागणार आहे.

Post a Comment

0 Comments