Hot Posts

6/recent/ticker-posts

कोंबीग ऑपरेशन दरम्यान ४ लोखंडी हत्यारे जप्त, आरोपी अटक करून लोखंडी हत्यार लपवण्यास मदत करणा-या आईस देखील केले सह आरोपी

 


      हडपसर -: पोलीस स्टेशन, पुणे शहर  मा. पोलीस सह आयुक्त सो. पुणे शहर, यांनी दिनांक ०८/०८/२०२५ रोजी २३/०० ते दिनांक ०९/०८/२०२५ रोजी सकाळी ०२/०० वा. चे दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये कोंबीग ऑपरेशन मोहीम राबवून पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून कारवाई करतील तसेच सर्व निर्जन स्थळे, गर्दीचे ठिकाणी प्रभावीपणे कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

      त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप, तपासपथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप निरीक्षक सत्यवान गेंड तसेच पोलीस अंमलदार कोंबीग ऑपरेशन कारवाई करीत असताना दोन संशयीत इसम मिळून आले. त्यांना नाव विचारले असता त्यातील एकाने त्याचे नाव विश्वजित उर्फ यश रामचंद्र मोरे वय २० वर्षे रा. सहकार कॉलनी गोंधळेनगर हडपसर पुणे असे सांगितले व एक विधीसंघर्षीत बालक असल्याचे समजले. त्यांचेकडे केले कौशल्यपुर्ण तपासामध्ये विधीसंघर्षीत बालकाच्या घरामधून ४ लोखंडी हत्यारे ताब्यात घेण्यात आली असुन सदरची हत्यारे ही घरामध्ये त्याची आई नामे रुपाली चौधरी वय ३५ वर्षे रा. सहकार कॉलनी गोंधळेनगर हडपसर पुणे यांचे परवानगीने ठेवले असल्याचे सांगीतले. सदरची हत्यारे जप्त करण्यात आली असुन सदर आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

     सदरबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ७२७/२०२५ भा. न्या. सं. कलम ३ (५), भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा.

     पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, अमित साखरे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महाविर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments